Skip to main content
x

कुलकर्णी, मृणाल रुचिर

       मृणाल रुचिर कुलकर्णी यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रख्यात लेखक गो.नी. दांडेकर यांची नात, प्रा. वीणा देव आणि डॉ. विजय देव यांची कन्या, चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी, डॉ. हेमा कुलकर्णी यांची सून असलेल्या मृणाल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वामीमालिकेद्वारे रमाम्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत, पुढे छोटा आणि मोठा असे दोन्ही पडदे गाजवले.

गोनीदांबरोबर गडकिे पालथे घालणार्‍या मृणाल प्रारंभी अभिनयाकडे गांभीर्याने पाहत नव्हत्या; पण त्यांच्या रमेवर रसिकांनी इतके अपरंपार प्रेम केले की, पुढे अभिनय हीच त्यांची मुय ओळख बनली. शालेय शिक्षण हुजूरपागा शाळेत, तर पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून बी.ए. आणि मराठी-इंगजी वाङ्मयात मास्टर इन लिटरेचरही पदवी घेणार्‍या मृणाल यांनी महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काही काळ काम केले आहे. त्यांच्या आजीच्या (नीरा दांडेकर यांच्या) आगहामुळे त्या गंगाधरबुवा पिंपळखरे, पद्माकर बर्वे व मालती पांडे-बर्वे यांच्याकडे गाणे शिकल्या. चित्रकला, ट्रेकिंग, छायाचित्रण व वाचन हे छंद जोपासण्याबरोबरच त्यांनी कथ्थकचेही शिक्षण घेतले आहे. व्यक्तिमत्त्वाचे पैलू जितके अधिक, तितका अभिनयही अधिक कसदार व संपन्न होतो, याचे मृणाल या साक्षात उदाहरण आहेत.

स्वामी’, ‘पिंपळपान’, ‘अवंतिका’, ‘राजर्षी शाहू महाराज’ ‘गुंतता हृदय हेअशा मराठी, तर श्रीकांत’, ‘हसरते’, ‘मीरा’, ‘टीचर’, ‘दी गेट मराठा’, ‘स्पर्श’, ‘नूरजहाँ’, ‘द्रौपदी’, ‘सोनपरी’, ‘झूठा सचया गाजलेल्या हिंदी मालिकांमधून अभिनय आणि व्यक्तिमत्त्वातला वेगळेपणा रसिकांच्या मनावर ठसवणार्‍या मृणाल, ‘माझं सौभाग्यया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आल्या. प्रारंभी सारे काही सोसणारी, मात्र नंतर नवर्‍याला वठणीवर आणणारी नायिका या चित्रपटात त्यांनी साकारली. जमलं हो जमलं’, ‘घराबाहेर’, ‘लेकरू’, थांग’, ‘जोडीदारहे मृणाल यांचे महत्त्वाचे चित्रपट. त्यांनी कमला की मौत’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘वीर सावरकर’, ‘कुछ मीठा हो जाएया हिंदी चित्रपटांतही निवडक भूमिका केल्या आहेत.

भूमिकांबाबतचा चोखंदळपणा, निवड करण्यामागची त्यांची दृष्टी हाही मृणाल यांचा नोंद घेण्याजोगा विशेष आहे. मालिकेतली भूमिका असो वा चित्रपटातली, मृणाल आपल्या तत्त्वाबाहेर जाऊन ती करणार नाही हे नक्की. राज कपूर यांच्या हीनाचित्रपटातील हीनाया भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली होती. वेगळ्या शक्यता निर्माण करणारी, मोठी वाट खुली करणारी ही संधी होती. मात्र अशा चित्रपटातले नायिकेचे दर्शन मनाला पटत-रुचत नाहीया कारणास्तव मृणाल यांनी ही भूमिका, नवी संधी नाकारण्याचे धाडस दाखवले.

माझं सौभाग्यया मृणाल यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. जोडीदारमध्ये त्यांनी सर्वसामान्य पतिवता आणि व्यावसायिक डावपेच खेळत व्यवसायाचा मोठा पसारा सांभाळणारी आधुनिक मुलगी अशी दुहेरी भूूमिका साकारली. या दुहेरी भूमिकेसाठी त्यांना स्कीनआणि फिल्मफेअरपुरस्कार मिळाले. घराबाहेरया चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अभिनयक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना स्मिता पाटील पुरस्कारमिळाला आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित बयोहा त्यांचा चित्रपट पॅनोरमासाठी निवडला गेला. मालिका, मॉडेलिंग, मराठी-हिंदी चित्रपट याबरोबरच त्यांनी काही प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटही केले आहेत. रूपसंपदा, बुद्धिचातुर्य व अभिनयनिपुणता असे एकत्रित वरदान मिळालेल्या मृणाल यांनी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू जाणीवपूर्वक जोपासले. अभिनयाहून वेगळा पर्याय माझ्यापुढे नव्हताच कधी, मी अभिनयाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही’, असे ऋषी कपूर यांचे म्हणणे मृणाल कुलकर्णी यांनी लहानपणी वाचले होते, तेव्हाच आपल्यापुढे एक नाही तर अनेक पर्याय असले पाहिजेत, असे त्यांनी ठरवून टाकले होते.

अध्यापक म्हणून काम करणे, संगीत शिकणे, नृत्यनिपुणता व अफाट वाचन करणे या सर्व गोष्टी त्या जागरूकतेचेच द्योतक आहेत.

कला आणि व्यवहार यांचे व्याप सांभाळताना पुण्यातील आपलं घरया अनाथगृहासाठीही त्या काम करत आहेत. मेकअप उतरवल्यावरहे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. अलीकडेच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करून प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंहा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

- स्वाती प्रभुमिराशी

 

 

संदर्भ :
संदर्भ : १) प्रत्यक्ष मुलाखत.