Skip to main content
x

सावंत, संदीप दत्ताराम

      संदीप दत्ताराम सावंत यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी साठे महाविद्यालयात प्रवेश घेतला.    येथून मानसशास्त्रातील  पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून  याच विषयातील एम.ए.ची पदवी प्राप्त केली.

  महाविद्यालयीन जीवनापासूनच संदीप सावंत यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण २५ एकांकिका दिग्दर्शित केल्या. प्रायोगिक चळवळीत  पाच वर्षे काम केल्यावर संदीप सावंत यांनी गो.नी. दांडेकरांच्या ‘रुमाली रहस्य’ कादंबरीवर मालिका करायचे ठरवले, पण निर्माता मागे हटल्याने ही मालिका झालीच नाही. २००४ मध्ये सावंत लिखित-दिग्दर्शित ‘श्वास’ हा चित्रपट प्रकाशित झाला. एखाद्या खेळाडूने पहिल्याच सामन्यात शतक ठोकावे, त्याप्रमाणे पहिल्याच चित्रपटाने संदीप सावंत यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान पटकावला आणि नंतर तो भारतातर्फे ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला. ‘श्वास’चे मराठी प्रेक्षकांनीही उदंड स्वागत केले.

- सुधीर नांदगांवकर

सावंत, संदीप दत्ताराम