Skip to main content
x

बापट, धुंडिराज गणेश

    धुंडिराज गणेश बापट यांचे शिक्षण आजोबांकडे झाले. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्या अग्निहोत्राची व श्रौतविद्येची परंपरा आहे. त्यांनी ज्ञानकोशाच्या द्वितीय खंडाच्या प्रस्तावनेमध्ये श्रौतविषयक माहिती लिहिली. स्वाध्यायमंदिर ही संस्था काढून त्रैवर्णिकांत वैदिक संस्कारांचा प्रचार केला. त्यांनी ‘स्वाध्याय’ मासिक काही दिवस चालवले. त्यांचे वक्तृत्वही परिणामकारक होते. त्यांनी अग्निष्टोम वगैरे यज्ञ केले. त्यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत - १. ऐतरेय ब्राह्मण - मराठी भाषांतर, २. शुक्लयजुर्वेद, वाजसनेयसंहिता मराठी भाषांतर, ३. आर्यांचे संस्कार, ४. श्रौतकोश इत्यादी.

       — संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
बापट, धुंडिराज गणेश