Skip to main content
x

देशपांडे, प्रभाकर शांताराम

          प्रभाकर शांताराम देशपांडे यांचा जन्म मुंबई येथे झाला. पुण्यातील वाडिया महाविद्यालय, तसेच वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. १२ सप्टेंबर १९४८ रोजी ते सैनिकी सेवेत रुजू झाले. मेजर प्रभाकर देशपांडे हे आर्टिलरी रेजिमेंटमध्ये तोफखाना कमांडर म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने बामेर भागात केलेली घुसखोरी दूर करण्यासाठी युद्धविरामानंतर भारतीय पलटण कार्यरत होती. त्या वेळी या पलटणीला साहाय्य करण्यासाठी ते तोफखान्यावर प्रमुख होते.
     दुसऱ्या टप्प्यातील कारवाईच्या वेळी या तुकडीला तोफगोळे आणि मशीनगन्सच्या माऱ्याला सामोरे जावे लागले. त्या वेळी त्यांचा तोफखाना उघड्यावर होता. पण तरीही, स्वतःच्या जिवाची पर्वा न करतात्यांनी शत्रूला गुंतवून ठेवले. केवळ त्यामुळेच भारतीय सैन्याच्या तुकडीला सुरक्षित स्थळी पोहोचता आले. दोन वेळा ते जखमी झाले, तरीही युद्धभूमीवरून माघारी येण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी दाखविलेले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण यांबद्दल त्यांना दि. १० ऑक्टोबर १९६५ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित केले गेले.
-संपादित

देशपांडे, प्रभाकर शांताराम