Skip to main content
x

घुर्ये, गोविंद सदाशिव

        हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे राहणारे असून यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण जुनागड येथे झाले. १९१८ साली हे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून संस्कृत, इंग्लिश घेऊन पहिल्या वर्गात एम.. उत्तीर्ण झाले. त्यांना बी..च्या परीक्षेत भाऊ दाजी प्राइज व गंगादास कालिदास शिष्यवृत्ती मिळाली होती. पुढे एल्फिन्स्टन महाविद्यालयात हे दक्षिणाफेलो होते. एम..च्या परीक्षेत त्यांना चॅन्सेलर्स मेडल, भगवानदास पुरुषोत्तमदास आणि सर लॉरेन्स जेकिन्स शिष्यवृत्त्या मिळाल्या. पुढे त्यांना स्प्रिंजर रिसर्च शिष्यवृत्ती व भगवानदास मूळजी प्राइज मिळाले. सन १९१९ पासून काही काळ हे एल्फिन्स्टन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. सन १९१९ पासून १९२०पर्यंत त्यांनी युनिव्हर्सिटी स्कूलमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास केला, तसेच विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते अधिक अभ्यासाकरता इंग्लंडला गेले. १९२०-१९२३ या काळात लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व केंब्रिज येथे अध्ययन केल्यानंतर ते केंब्रिजमधून पीएच.डी. झाले. सन १९२३ पूर्वीच्या गव्हर्नमेंट सबॉर्डिनेट सर्व्हिसचा त्यांनी राजीनामा दिला. त्यांना एक वर्ष मुंबई विद्यापीठाची खास शिष्यवृत्ती मिळाली होती. सन १९२४पासून मुंबई विद्यापीठाने त्यांची रीडर इन सोशिऑलॉजीम्हणून नेमणूक केली. यांची कित्येक ग्रंथपरीक्षणे सर्व्हंट ऑफ इंडिया’, ‘सोशल सर्व्हिस क्वार्टली’, ‘जर्नल ऑफ दि बाँबे ब्रँच ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी’, ‘करंट सायन्स व जर्नल ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ बाँबेयांत प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय लंडन, व्हिएन्ना येथील सोशिऑलॉजिकल व मॅन इन इंडिया या पत्रांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. यांचे संशोधनात्मक लेखन सतत चालू असते.

यांचे संशोधनात्मक लेखन अगदी नवे आणि जगातील त्या शास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांचा विचार लक्षात घेऊन लिहिलेले असल्यामुळे मौलिक असते. यांच्या काही लेखांची यादी पुढे दिली आहे.

1. Rent Statistics of the Bombay Labour Office (Indian Economist,1925), 2. Growth of Population in India and Elswhere (Indian Economist 1925, 3.Ethnic Theory of Caste ( Man in India,1925), 4.. Civilization and Fecundity (Man in India,1925), 5.Funerary Movements in India-Two Articles (Man in India,1926), 6.Some Village Studies (in collaboration with another,1927), 7.. Working Class Conditions in Bombay ( Indian Journal of Economics1931), 8.Untouchable Classes and Their Assimilation in Hindu Society(Aryan Path,Feb,1933),9. Fertility  data of Indian Census of 1931(Bombay Unvisersity Journal 1934),10. The Age of Marriage (Marriage Gygiene 1935), 11. Presidential  Address, Section of Anthropology (Indian Science Congress,1935),12.A note on the Indian Potter’s Wheel,(Man in India 1936),13.Marriage and Widowhood in India, (Marriage Gygiene 1936), 14.Account of an exploratory Tour in Certain parts of Sind in search of Pre-historic Culture (Bombay University Journal 1936),15. A note on Cross-Cousin Marriage in Kathiawar, (Bombay University Journal 1936), 16.Disposal of Human Placenta, (Bombay University Journal 1937),17. A Buddhist Site near Khaipur (Bombay University Journal 1937),18.Census Contributions to the Racial Analysis of India (Quarterly Journal of Mythic Society,1937),19. The Social Progress (R. R. Kale Memorial Lecture,1938, G.I. P.E),20. Social Work and Sociology (Reprinted from the Servant of India,1938),21. Physical Data from Kathiawar (Jubilee Number of the Journal of the Bombay Anthropological Society),22. Some Problems in Indian Ethnic History (Presidential Address of the Section of Ethnology and Folk-lore of the 9th All India Oriental Conference,1938),23. A Type of Boonerang from Palanpur (Current Sciences,1939),24.Two old Sites in Kathiawar (Bombay Unvisersity Journal 1939),25.Some Old Sites in Palanpur(Science and Culture,1939),26. Sex Habits of a Sample of Middle Class People in Bombay(Indian Population Problems,1939),27. Birth Control Practice in Bombay (Bombay Unvisersity Journal 1939),28. Salary and other Conditions of Work of Clerks in Bombay City(Bombay Unvisersity Journal 1941),29. Woman and Indian Life of Tomorrow (Bulletin of National Council of Women,Feb. And March 1942),30. Anthropological Approach to the Study of Indian Sociology (Science and Culture, April 1942), 31. Dual Organization in India ( J.R. A. I. 1923), 32. Egyptian Affinities of the Indian Funerary Practices(Anthropos,1923)

यांचे ग्रंथ-

Caste and Race in India (Kegan Paul and Co, 1932, ;Aborigines- so-called and Their Future’ (Gokhale Institute of Economics and Politics,Poona,1943)

-संपादित

घुर्ये, गोविंद सदाशिव