Skip to main content
x

डिकास्टा, अ‍ॅलन अल्बर्ट

    अ‍ॅलन अल्बर्ट डिकास्टा यांनी एका बॉम्बफेकी विमानांच्या स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर असताना ४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूच्या रावळपिंडी विमानतळावर सर्वप्रथम हल्ला चढविला. दुसऱ्या दिवशी त्यांनी चिस्ती की मंडी या ठिकाणी तीन रणगाडे उद्ध्वस्त केले.

     तिसऱ्या दिवशी डेरा बाबा नानकजवळ एकत्रित झालेल्या शत्रूच्या रणगाड्यांवर, विमानविरोधी तोफांच्या तुफान गोळीबारास न जुमानता, केलेल्या हवाई हल्ल्याचे त्यांनी नेतृत्व केले.

     ७ डिसेंबर १९७१ रोजी डिकास्टा यांनी सुलेमानकी भागात कमी उंचीवरून उड्डाण करीत  छायाचित्रांद्वारे टेहळणीचे विशेष कार्य केले आणि त्याचबरोबर नारोबाल रेल्वे स्टेशनवरील हल्ल्याचे नेतृत्व करून स्वत: बऱ्याच रेल्वे वाघिणी आणि संस्थांचे नुकसान करून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर त्यांनी अनेक टेहळणीसाठीची विशेष उड्डाणे केली आणि शत्रूबद्दलची मोठी माहिती जमा केली.

त्यांनी रायविंढ आणि कसूर-लाहोर रेल्वे मार्गावर हल्ले करून शत्रूच्या विमानविरोधी तोफांच्या प्रतिकारास व पाकिस्तानच्या हवाई विरोधास न जुमानता ठरविलेले प्रत्येक लक्ष्य उध्वस्त केले.

संपूर्ण युद्धकाळात विंग कमांडर डिकास्टा यांनी दाखविलेल्या शौर्य, दृढनिश्चय, नेतृत्व आणि युद्धकौशल्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

- रूपाली गोवंडे

डिकास्टा, अ‍ॅलन अल्बर्ट