Skip to main content
x

धुमाळ, अनंत

      हिंदी सिनेमात १९५० ते १९७० या काळात मुख्य कथेच्या जोडीला एक विनोदी उपकथानक असे. आगा, जॉनी वॉकर, मुकरी इ. हिंदी भाषिकांचा विनोद त्यात असे. पुढे मेहमूदही  यामध्ये आला. मात्र मराठी नाटकांतून चित्रपटांतून आलेले अनंत धुमाळ त्याआधीपासूनच या विनोदी उपकथानकामध्ये चांगलेच रुजलेले होते.

     ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटात धुमाळ यांनी मद्रासी संगीत शिक्षकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे ते चित्रपटसृष्टीत नावारूपाला आले. त्यावरून करदारनी हिंदीत ‘चाचा चौधरी’ केला, तेव्हा धुमाळ यांना तीच भूमिका दिली. त्यामुळे विनोदी अभिनेता म्हणून ते हिंदीत लोकप्रिय ठरले. 'हावडा ब्रीज', 'बम्बई का बाबू', 'कश्मीर की कली', 'गुमनाम', 'दो बदन', 'लव्ह इन टोकिओ', 'बेनाम' अशा काही चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. 

- सुधीर नांदगांवकर

धुमाळ, अनंत