Skip to main content
x

गायकवाड, तात्याबा

     जम्मू-काश्मीरच्या १९४७-१९४८च्या  युद्धात दि. ३ मार्च १९४८ रोजी शत्रूशी लढत असताना मेजर चोप्रा यांना शत्रूच्या गोळीबारामध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्या वेळी शत्रूच्या ताब्यात असलेल्या जागेवरून त्यांचे शव आणण्यासाठी नाईक तात्याबा गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते.
     अतिशय धोकादायक परिसरातून सरपटत जाऊन, शत्रूच्या गोळीबाराला चुकवततात्याबा गायकवाडांनी मेजर चोप्रांचे शव ताब्यात घेतले. पण तेवढ्यात शत्रूची गोळी तात्याबांचे सहकारी शिपाई गुदेकर यांना लागली. व ते जखमी झाले. अशा बिकट प्रसंगात प्रसंगावधान राखून  थंड डोक्याने तात्याबांनी मेजर चोप्रांचे शव आणि जखमी शिपाई गुदेकरयांना सुरक्षित जागेत आणले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच गुदेकर यांचा मृत्यू झाला होता.
     अतिशयप्रतिकूल परिस्थितीमध्ये नाईक गायकवाड आपले दुसरे सहकारी शिपाई सुधीर चाळके यांच्या मदतीने दोन्ही शहीद जवानांचे मृतदेह शत्रूच्या गोळीबारालासामोरे जाऊन कंपनी क्षेत्रामध्ये घेऊन आले. या बहादुरीबद्दल नाईक तात्याबा गायकवाड यांना ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
-संपादित

गायकवाड, तात्याबा