Skip to main content
x

घोडेस्वार, दादाराव रामराव

        दादाराव रामराव घोडेस्वार यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूर  बाजार  या ठिकाणी झाला. दि. ३० जानेवारी १९५० रोजी ते सैन्यात भारती झाले. १९७१ च्या लढाईत दि. १२ डिसेंबर रोजी पाकिस्तानने राजस्थान भागावर हल्ला चढविला. त्या वेळी सुभेदार दादाराव घोडेस्वार महार रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व करीत होते. त्या परिसरातील सहाशे मीटरचे सुरुंग क्षेत्र होते. त्याची पर्वा न करता घोडेस्वार यांच्या तुकडीचा शत्रूशी समोरासमोर सामना झाला.
    शत्रूशी  हातघाईची लढाई करत त्यांनी चौकी ताब्यात घेतली. शत्रूनेही पुन्हा चौकीवर ताबा मिळवण्यासाठी समोरून हल्ला केला. सुभेदार घोडेस्वार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूवर हल्ला चढवीत त्यांना पळवून लावले. या युद्धादरम्यान त्यांनी आपल्या धैर्याचे, वीरतेचे, नेतृत्वगुणांचे दर्शन घडविले. त्यांच्या  या  शौर्यामुळे त्यांना दि. १२ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्रा’ ने सन्मानित करण्यात आले.
-संपादित

घोडेस्वार, दादाराव रामराव