हाशिम, आमिर अली
हाशम आमिर अली यांनी १९२४ साली पुणे कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी, तसेच १९२९ साली कॉर्नेल विद्यापीठ न्यूयॉर्क, यू.एस.ए. येथून पी.एचडी. पदवी प्राप्त केली. १९२६ ते १९३० या काळात त्यांनी ज्वारी संशोधन केंद्र परभणी येथे प्रक्षेत्र अधीक्षक म्हणून काम केले. पुढे १९४६ ते १९५६ या काळात त्यांनी उस्मानिया विद्यापीठात प्राचार्य आणि अधिष्ठाता या पदावर काम पाहिले. १९४७ ते १९७४ या काळात त्यांनी सात पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी पंजाब, नवी दिल्ली आणि हैदराबाद येथे वेगवेगळ्या पदांवर काम केले.
- संपादित
हाशिम, आमिर अली