Skip to main content
x

पेंढारकर, त्यागराज बाबूराव

बाबूराव पेंढारकर यांचे सुपुत्र म्हणून जगाला परिचित असले तरी एक संवेदनशील छायाचित्रकार म्हणून त्यागराज पेंढारकर चित्रपटसृष्टीला परिचित आहेत.

त्यागराज पेंढारकर हे चित्रपटसृष्टीसाठी लोकप्रिय असणाऱ्या करवीर नगरीत जन्मले. घरातूनच कलेचा वारसा लाभलेल्या त्यागराज यांनी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनिअरिंगची परीक्षाही त्यांनी दिली. पण दोनदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून लागलेला छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी भालजींच्या स्टुडिओत कॅमेरा विभागामध्ये ते दाखल झाले. पण लवकरच दुसरे काका व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत परछाईचित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण यांना छायालेखनात साहाय्यक झाले. दो आँखे बारह हाथया चित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण आजारी पडल्याने त्यागराज यांना छायालेखनाची संधी मिळाली. यानंतर मौसीआणि टेक्निकलर नवरंगनंतर राजकमल सोडून ते मुक्त छायालेखक-छायाचित्रकार म्हणून काम करू लागले. जेमिनीचा पैसा या प्यारव अन्य चित्रपट, काही गुजराती चित्रपट यांबरोबरच दादा कोंडकेचा आली अंगावर’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘यशोदा’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘चव्हाटा’, ‘बाल शिवाजी’, ‘आघात’, ‘अभिलाषाइत्यादी मराठी चित्रपटही केले. त्यागराज यांचे पडद्यामागचा माणूसहे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

- सुधीर नांदगावकर

संदर्भ
१) पेंढारकर त्यागराज, ‘पडद्यामागचा माणूस’, रावा प्रकाशन, पुणे; २०११.
पेंढारकर, त्यागराज बाबूराव