Skip to main content
x

पीटर्सन, पीटर

     पीटर पीटर्सन यांनी एडिम्बरो व ऑक्सफर्ड येथे इंग्रजीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली (१८७३). मुंबई सरकारतर्फे संस्कृत व प्राकृत ग्रंथ शोधण्याकरिता त्यांनी गुजराथ व राजपुतान्यामध्ये अनेक दौरे काढले. राजपुतान्यात हिंडत असता त्यांना इतिहासाला उपयुक्त अशी पुष्कळ संस्कृत काव्ये सापडली.

कर्नल टॉडला न लागलेला कोटाच्या जवळील कणसाराच्या मंदिरावरील शिलालेख त्यांनी बरोबर लावून शुद्धतापूर्वक संपादन केला. त्यांनी पुस्तकाच्या शोधासंबंधी सहा रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत. त्यात अनेक महत्त्वाचे ग्रंथ आहेत. शिवाय अलवार राज्यातील पुस्तक भांडारांचे महत्त्वपूर्ण सूचिपत्र त्यांनी  १८९२ मध्ये प्रसिद्ध केले आहे.

संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
पीटर्सन, पीटर