Skip to main content
x

प्रयाग, सुबराव हनुमंत

      सुबराव प्रयाग यांचा जन्म धारवाडजवळील नारायणपूर येथे झाला. त्यांनी १९१०मध्ये मुंबई विद्यापीठाची शेतकीतील पदवी संपादन केली. १९२१मध्ये त्यांनी खान्देशात कापसावरील संशोधनाचे काम सुरू केले व ‘जरीला’ कापसाचा शोध लावला व त्यांना १९३४मध्ये ब्रिटिश सरकारने ‘सर’ ही पदवी दिली ‘ऑर्डर ऑफ दि एम्पायर’ हा किताबही त्यांना मिळाला होता. शेेतकी विद्यापीठानेही कापूस संशोधनाबद्दल त्यांना डी.लिट. पदवी दिली. त्यांनी आंब्यावर विविध प्रयोग केले. कळमसर (जळगाव) येथील बोरशा या आंब्यांच्या झाडाची पहिली कलमे १९३४ साली त्यांनी व आप्पासाहेब रणदिवे यांनी केली. तसेच सुरत व धारवाड येथेही कापसावर संशोधन केले.

- संपादित

प्रयाग, सुबराव हनुमंत