Skip to main content
x

रड्डी, अरविंद गोविंद

        रविंद गोविंद रड्डी यांचा गुजरात मधील अमरेली या गावात झाला. त्यांचे वडील भारतीय प्रशासन सेवेत, सेंटलमेंट कमीशनर व कलेक्टर या पदावर कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा कर्नाटक कॉलेज धारवाड येथे संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते व पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातीही त्यांचा जवळचा संपर्क होता.

        अरविंद रड्डी यांचं प्राथमिक शिक्षण द्वारकेला झालं. द्वारकेला अथांग समुद्र आहे. बालवयातच त्या समुद्राच्या हिंदकळणाऱ्या लाटांनी मनात घर केलं आणि तेव्हापासूनचं मनात निसर्गाचं वेड निर्माण झालं. परंतु वडीलांच्या बदलीमुळे द्वारका सोडावी लागली आणि त्यानंतरचं शिक्षण पुण्यात दस्तुर हायस्कूलमध्ये त्यांनी ते एस.एस्सी. पर्यंतच शिक्षण त्यांनी घेतलं. त्यानंतर १९५३ साली त्यांनी बी.एस्सी.ला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. निसर्गाचे प्रचंड वेड हेच होते. इथून बी. एस्सी. प्रथम क्रमांक एम.एस्सी. प्रथम क्रमांक. १९५९ साली वनसेवेची स्पर्धा परीक्षा त्यांनी दिली आणि भारतभरातून या परीक्षेत पास झालेले प्रशिक्षण पास झालेले प्रशिक्षणाकरिता डेहराडून येथे केले जातात. त्या ठिकाणी अरविंद रड्डींना भारतातील विविधतेचे आणि त्यातील एकात्मतेचं जवळून दर्शन झाले. प्रशिक्षणानंतर १९६२ साली अरविंद रड्डी यांची चंद्रपूरच्या वनविभागात साहाय्यक वनसंरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी नेमणूक झाल्यानंतर योगायोगानेच त्यांच्या आनंद द्विगुणित करणारी घटना घडली. ती म्हणजे चंद्रपूरच्या त्या जंगल परिसरात ताडोबा अभयारण्याच्या जागी नेमणूक झाली आणि अरविंद रड्डी यांनी त्यात मनापासून सहभाग घेतला आणि त्या अभयारण्यात काम केले.

         यादरम्यान त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली ती म्हणजे १९६८ साली त्यांना कॅनेडियन सरकारची कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यासाठी त्यांचा विषय होता. वन्यप्राणीशास्त्र या प्रबंधासाठी त्यांनी हरणांवरती प्रबंध तयार केला. या दरम्यान त्यांनी रात्ररात्र जागरण करून हरणांवरती संशोधन केले. अशा प्रकारच्या अभ्यास करून सादर करणारे अरविंद रड्डी हे पहिलेच भारतीय अस शकतील. त्यांनी दृष्टिकोन व्यापक होणे या संशोधनांना १९६८ मध्ये पुन्हा त्यांची चंद्रपूर विभागीय वनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

         या कालावधीत भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून चंद्रपूरचे अभयारण्य पाहण्यासाठी व जंगलात वास्तव्य करण्यासाठी अफगाणिस्तानचे पंतप्रधान नईम व त्यांच्यानंतर इराणचे शहेनशहा मुहम्मद रेझा पेहलबी हे आले होते. जंगलात कुठलाही धोका होऊ शकतो, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यापासून ते जंगलातील सर्व ठिकाणे व्यवस्थित दाखवण्यापर्यंतची मुख्य जबाबदारी सहकार्यासह रड्डी यांनी अतिशय उत्साहाने पार पाडली.

         १९७१ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासकार्यक्रमांतंर्गत वनप्राणी व निसर्ग आधारित पर्यटन अभ्यास करण्यासाठी ते अफ्रिकेला रवाना झाले. भारत सरकारच्या सहकार्याने जंगलवाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर हवाई बीज पेरणे कार्यक्रम झाला. याचे रड्डी समन्वयक होते. घुस उंदिरांची वाढणारी संख्या , घनदाट झाडी, प्रचंड मोठी जंगले आणि वन्यप्राण्यांचे असलेले वैविध्य यांचा सखोल अभ्यास रड्डींनी आपल्या या दौऱ्यात केला. १९८५ मध्ये भारतात सामाजिक वनीकरण नावाची एक अभिनव कल्पना उदयास आली. या कल्पनेस अमेरिकेचे साहाय्य होते. यादरम्यान जंगलेतर पडीक जमिनीवर वृक्षलागवड करायची परंतु वृक्षलागवडीनंतर सामाजिक दुर्लक्षाने ती झाडे वाढत नाहीत तेव्हा समाजात जाऊन त्या झाडाचे महत्त्व, वन्यजीवाचे महत्त्व व इतर माहिती जनतेला द्यायची आणि सामाजिक वनीकरण करायचे हे काम अरविंद रड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रकल्पानंतरच सरकारी पातळीवरच्या प्रयत्नावरच हिरवा झाल्याचे दिसून आले.

          सामाजिक वनीकरण प्रकल्पादरम्यान आलेली महत्त्वाची अडचण म्हणजे कोकणातल्या कोकणात सरकारी मालकीची जमीन राबवणे कठीण होते. तेव्हा अरविंद रड्डी यांनी एक वेगळीच युक्ती लढवली आणि ती म्हणजे समुद्राकाठची खारफुटीची जमीन, या जमिनीत कुठलीही वनस्पती येत नाही पण म्हणून समुद्राच्या खाऱ्या पाण्यात येणारी कांदणी, योनर, चोपी या वनस्पतींची समुद्रकाठावरच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली, ही वनस्पती गुरेही आवडीने खातात हे रड्डी ह्यांना माहीत होते. त्यामुळे गुरांना चाराही झाला आणि समुद्रातील लहान मासे यांना प्रजोत्पादनासाठी या वनस्पतींच्या मुळात अडचणीत अंडी घालण्यास जागाही मिळाली आणि समुद्रकिनारा हरित झाला. हे त्यांचे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरले. त्याचा या संशोधनासाठी जगभरातून गौरव झाला आणि जपानमधील एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रमाणे निमंत्रित करण्यात आले.

           आज निवृत्तीनंतर अरविंद गोविंद रड्डी पुण्यात स्थायिक असून एम.आय.टी. कॉलेज, पर्यावरण संतुलित ग्रामीण विकास, निसर्ग पर्यटन, एम.बी.ए. पर्यावरण विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करतात. याही वयात त्यांचे जंगल व निसर्गवेड संपलेले नसून आजही त्यांनी मातीशिवाय पालापाचोळ्याचा उपयोग करून आपल्या घरात आणि गच्चीत भले मोठे वैविध्यसंपन्न उद्यान उभे केले आणि तेवढ्याच नेटाने ते आता सांभाळत असतात. आजही ते निसर्गसंवर्धन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण संतुलित ग्रामीण विकास आणि निसर्ग पर्याटन यासाठी आग्रही असतात.

- दत्ता कानवटे

रड्डी, अरविंद गोविंद