Skip to main content
x

सोमाणी, राधेश्याम भगवानदास

           राधेश्याम भगवानदास सोमाणी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये वाशीम येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाशीम येथे झाले. त्यांनी अकोला कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) व इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर आणंद, गुजरात येथून एम.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. काही काळ सोमाणी यांनी मंगरूळपीर येथे व्याख्याता पदावर काम केले व नंतर १९७०मध्ये त्यांची कृषी महाविद्यालय येथे वनस्पति-रोगशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली.

           सोमाणी यांनी १९८६-८७मध्ये अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्र येथे रोगशास्त्रज्ञ या पदावर व १९८७-९४ या काळात ज्वारी संशोधन केंद्र डॉ.पं.दे.कृ.वि.त ज्वारीच्या रोगावर काम केले. त्यांनी १९९३-०३ या काळात शेतमाल विकास संशोधन केंद्र येथे कार्य केले. त्यांनी २००२-०३ या काळात सहयोगी अधिष्ठाता व अधिष्ठाता या पदावरही कार्य केले. पीएच.डी.चे संशोधन करताना, पावसामुळे लालसर काळ्या होणार्‍या ज्वारीच्या दाण्यावर व बुरशीची प्रतिकारक शक्ती रासायनिक पद्धतीने कशा प्रकारे कमी करता येऊ शकते याचा शोध लावला. शेतमाल विकास केंद्रात काम करत असताना त्यांनी ज्वारीपासून मद्यार्क, ग्लुकोज व फ्रुक्टोज बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी विकसित केलेल्या कॉम्पॅक्ट डिस्टिलेशन कॉलममुळे ९०% तीव्रतेचा शुद्ध मद्यार्क तयार करणे शक्य झाले. गोड ज्वारीच्या रसापासून मद्यार्क निर्मिती होऊ शकते हे डॉ. रत्नाकर यांच्याबरोबर केलेल्या संशोधनात त्यांनी दाखवून दिले. त्यांनी कोणतेही रसायन न वापरता विविध फळे व भाज्यांचे रंग, गुण व वास टिकवून शुद्ध रूपात पावडर करण्याची पद्धत विकसित केली याबद्दल त्यांनी एकस्व क्र. १८०८०३ घेतले. तसेच तृणधान्याचे स्टार्च घटक वेगळे न करता ग्लुकोज व फ्रुक्टोज सायरप तयार करण्याचे दुसरे एकस्व क्र. १९०५६२ मिळवले. जिवाणू संवर्धनासाठी बायोरिअ‍ॅक्टर पद्धत विकसित केलेली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात जिवाणू खते तयार करून शेतकर्‍यांना वाटप केले. त्यांचे १००पेक्षा जास्त लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ६० आंतरराष्ट्रीय पातळींवरील परिसंवाद व कार्यशाळांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधन करण्यासाठी व ५ विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांना ११ नवीन बुरशींच्या प्रजातीचे नामकरण करण्याचे व भारतात दोन नवीन बुरशी शोधून काढण्याचे श्रेय मिळालेले आहे. ट्रायकोडर्मा बुरशीवर त्यांचे मोलाचे संशोधन कार्य आहे.

           सोमाणी यांनी आपले पीएच.डी.चे गुरू प्रा. वांगीकर यांच्या नावे दोन बुरशीच्या प्रजातींची नावे देऊन १) र्झीललळपळर ुरपसळज्ञरीरळ २) र्ढीीपज्ञींशश्रश्रर ुरपसळज्ञरीरळ त्यांना सन्मानित केले आहे. ते फायटोपॅथॉलॉजी या संस्थेचे मानद सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सचेदेखील ते मानद सदस्य आहेत. त्यांनी ३ पुस्तिका प्रकाशित (पानवेलीवरील रोग, कपाशीवरील रोग, सोयाबीनवरील रोग) केल्या आहेत. तसेच त्यांना केंद्रीय पीक संरक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे निरुला अ‍ॅवॉर्ड देण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याबद्दल त्यांना के.जी. जोशी पुरस्कार, व्हि.पी. गोखले पुरस्कार तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.ने ताम्रपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांना नॅशनल रीसर्च इन्स्टिट्यूट, लंडन येथे तृणधान्यांवरील प्रक्रियांसाठी कन्सल्टंट म्हणून बोलावले गेले. तसेच त्यांना इस्कॉहॉन विद्यापीठ इराण येथे मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव