Skip to main content
x

वझे, कृष्णाजी विनायक

     कृष्णाजी विनायक वझे एल.सी.ई. झाले. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी पत्करली. कृष्णाजी वझे यांना सन्माननीय अशी ‘रावसाहेब’ ही पदवी देण्यात आली. वझे यांनी ‘धर्मशिक्षणाचा ओनामा’ (एकूण १-८ भाग) ही पुस्तकमाला लिहून प्रसिद्ध केली. या पुस्तकमालेतून त्यांनी जुन्या आचारविचारांचा नव्या दृष्टीने उलगडा करून दाखवला.

     कृष्णाजी विनायक वझे यांनी शिल्पविषयक जुन्या संस्कृत वाङ्मयाचा शोध घेऊन अनेक हस्तलिखिते मिळवली व ती प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर आपले महत्त्वाचे विचार प्रदर्शित केले. त्यांच्या व्याख्यानाची मांडणीही मोठी मनोरंजक व नवी असे. त्यांचे ग्रंथ-शिल्प  १) आर्य शिल्प - हिंदी यंत्रशास्त्र, २) प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र ४ भाग, ३) प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार, ४) शिल्प शिक्षणाचे महत्त्व; चित्र ५) आर्य शिल्पचित्रविद्या अथवा चित्रलेखनशास्त्र; युद्ध ६) प्राचीन युद्धविद्या; स्वराज्य ७) आजच्या स्वराज्यसंस्था (म्युनिसिपालिटी वगैरे प्राचीनपासून आजतागायत); व्यापार ८) व्यापारी शिक्षणमाला पुस्तक १ले, ९) व्यापारीमित्र. याशिवाय काश्यपशिल्पम् वगैरे संस्कृत ग्रंथ शोधून त्यांनी प्रसिद्ध केले.

संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
वझे, कृष्णाजी विनायक