Skip to main content
x

जाफर एम.

            जाफर यांनी १९३८ साली उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर आय.ए.आर.आय. नवी दिल्ली येथून असोसिएटशिप (१९४०) आणि विस्कॉनसीन, यू.एस.ए. येथून पीएच.डी. पदवी (१९४९) मिळवली. १९४७ साली फाय साइन या झिटा, अमेरिका येथील जीवशास्त्रीय संस्थेत सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली. डॉ. जाफर हे भारतीय आनुवंशिकी आणि वनस्पती पैदास संस्थेचे संस्थापक सदस्य होते. परभणी येथील संशोधन केंद्रात अर्थ वनस्पतिशास्त्रज्ञ या पदावर असताना खरीप आणि रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या सुधारित जाती निर्मितीचे काम केले. या संस्थेत त्यांनी १२ वर्षे संशोधन कार्य करून ज्वारीबरोबरच इतर पिकांवरही संशोधन केले व या पिकांसाठी योग्य अशा लागवडीच्या पद्धतीचीही शिफारस केली.
    - संपादित

जाफर एम.