Skip to main content
x

जगदाळे, किसन रामराव

     किसन रामराव जगदाळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे झाला. वयाच्या सतराव्या वर्षी, दि. १४ ऑक्टोबर १९६५ रोजी ते सेनादलात रुजू झाले. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या एका तुकडीत ते शिपाई म्हणून कार्यरत होते. पूर्व भागातील शत्रूचे एक ठाणे जिंकण्याची जबादारी त्यांच्या तुकडीवर सोपवण्यात आली होती. या तुकडीने त्या ठाण्यावर चढाई केली. पण शत्रूच्या मशीनगन्स आणि तोफांच्या माऱ्यांपुढे त्यांच्या तुकडीचे प्रयत्न असफल होत होते. ही परिस्थिती पाहून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जगदाळे पुढे सरसावले. रांगत-रांगत ते शत्रूच्या ठाण्याच्या रोखाने निघाले. सह्तृच्या खंदकाजवळ येताच त्यांनी हातबॉम्ब फेकून पहिली मशीनगन बंद पाडली. तसेच रांगत पुढे जात त्यांनी साहृच्या धडाडणाऱ्या तोफा नि कडाडणाऱ्या मशीनगन्स निकामी केल्या. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना ‘वीरचक्र’ देण्यात आले.
-संपादित

जगदाळे, किसन रामराव