Skip to main content
x

जोईल, दीपक पांडुरंग

 

दीपक पांडुरंग जोईल हे देवगड तालुक्यातील कातवन येथील एक यशस्वी व प्रागतिक विचाराचे आंबा उत्पादक आहेत. कातवन हे समुद्रकाठचे छोटे खेडे आहे. जोईल यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत झाले व शास्त्र विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी येथे झाले.

आंबा उत्पादन हा जोईल यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. आज त्यांच्याकडे ६००पेक्षा अधिक आम्रवृक्ष आहेत, तसेच ४० नारळ वृक्ष व १०० काजू झाडे आहेत. आंबा कलम लावल्यावर पहिली चार-पाच वर्षे झाडाला पाणी द्यावे लागते. त्यानंतर झाड पावसाच्या पाण्यावरच वाढते. कातवनच्या भागातील देवगड आंब्याला विशेष रंग, स्वाद व चव आहे. त्यामुळे त्याला किंमतही चांगली मिळते. सहा डझनाच्या पेटीस तीन-साडेतीन हजार रुपये किंमत मिळू शकते. त्यामुळे नारळ, पोफळी इत्यादी पिकांपेक्षा आंबा फळबाग अधिक फायदेशीर ठरते.

मुंबईला माल पाठवण्यातील अडचण लक्षात घेऊन जोईल यांनी नजीकच्या बाजारपेठा शोधल्या. विशेषतः बेळगाव, निपाणी, सांगली या बाजारपेठांना त्यांनी माल पाठवायला सुरुवात केली. ही ठिकाणे मुंबईच्या मानाने जवळ असल्याने समक्ष हजर राहता येते व लिलाव आपल्यासमोर होतात व काय भाव ठरला हे ताबडतोब समजते. मुंबई बाजारात माल पाठवण्यासाठी जोईल यांनी लोखंडी पेट्या वापरात आणल्या. त्या पाच-सहा वर्षे टिकतात. मुंबईला पेटीतून आंबे पाठवले जातात व त्या पेट्या आंबा उतरवून परत केल्या जातात. लाकडी पेटी निकामी झाली म्हणजे ती विकली जाते व त्याचे १७ ते १८ रुपये मिळतात. आंबा उद्योगास पूरक असा कॅनिंग व्यवसाय जोईल यांनी लहान प्रमाणावर सुरू केला आहे,  त्याचा विकास करण्याचीही त्यांची योजना आहे.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].