Skip to main content
x

जोशी, महादेव मल्हार

     महादेव मल्हार जोशी लहानपणापासून अत्यंत हुषार म्हणून गणले जात होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोरेगाव येथे, नंतर इंग्रजी शिक्षण रोहे येथे व इंग्रजी पाचवीपासूनचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिशमध्ये झाले. त्यांना मॅट्रिकमध्ये पहिली जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी एम.ए. संस्कृतमधील सर्व बक्षिसे मिळवली. सरकारी नोकरी मिळण्याचा संभव असतानाही यांनी राष्ट्रीय भावनेतून खासगी नोकरी पत्करली व नगर सोसायटीच्या गुरुकुलात हेडमास्तर म्हणून काम केले. १९२०मध्ये तेथून ते जुनागडला गेले व बहुद्दीन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्रोफेसर म्हणून नोकरी करू लागले. तेथे यांनी उत्तम लौकिक संपादन केला. पंचवीस वर्षे नोकरी केल्यानंतर यांनी पेन्शन मिळाली. पण तिचा उपभोग घेण्यास ते जगले नाहीत. लेखक व वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

     त्यांना घरात ‘अण्णा’ असे म्हणत. तरल बुद्धिमत्ता, प्रगाढ विद्वत्ता, सखोल व गाढा अभ्यास, जुन्या परंपरेचा जाज्वल्य अभिमान, देशप्रेम, झळ सोसून केलेला त्याग, विचारांची तरलता वगैरे गुण त्यांच्यात होते.

     महादेव मल्हार जोशी यांचे ग्रंथ -

     १. आधुनिक सुशिक्षितांचा वेदान्त. महादेव मल्हार जोशी यांनी आपल्या शंकांची व मतभेदाची पुस्ती जोडली आहे. तत्त्वज्ञानाची इतक्या उच्च भूमिकेवरून केलेली मनोरंजक चर्चा अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडेल, असे काका कालेलकरांनी या पुस्तकासंबंधी लिहिले आहे.

    २. सच्चिदानंद बाबांची पत्रे.

 — संपादित 

जोशी, महादेव मल्हार