Skip to main content
x

जठार, मधुकर शांताराम

     मधुकर शांताराम जठार यांचा जन्म पुण्यात झाला. दि. ६ नोव्हेंबर १९५४ रोजी त्यांना वायुसेनेत नियुक्ती मिळाली. १९६५ च्या भारता पाक युद्धात ते एका लढाऊ स्क्कॉड्रनचे कमांडर होते. त्या स्क्कॉड्रनने चौदा लढाऊ उड्डाणे केली. दि. ७ सप्टेंबर १९६५ रोजी भिगनरवाला हवाई तळावर हल्ला करण्याकरिता त्यांनी आठ विमानांची व्यूहरचना करून हल्ला केला. या हल्ल्यात शत्रूचे एक सेबरजेट नष्ट करून दुसरे विमान निकामी केले गेले. यशस्वी हल्ले करून त्यांनी आपले स्क्कॉड्रन परत आणले. या कामगिरीसाठी त्यांना दि. ७ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र’ प्रदान केले गेले. ते पुढे विंग कमांडर पदापर्यंत पोहोचले.
-संपादित

जठार, मधुकर शांताराम