कॅडी, टॉमस
ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी म्हणून १८२२मध्ये मेेजर टॉमस कँडी प्रथम हिंदुस्थानात आले. १८३१ पासून त्यांनी शिक्षण खात्यात कामे केली. कॅप्टन मोलस्वर्थच्या मराठी-इंग्लिश कोशास त्यांनी बरीच मदत केली होती. कॅप्टन मोलस्वर्थने विलायतेला प्रयाण केल्यामुळे, अपूर्ण राहिलेला तो ग्रंथ टॉमस कँडी यांनी १८४९-४७ मध्ये पूर्ण केला. या ग्रंथाची सुधारलेली आवृत्ती त्यांनी १८७३मध्ये पुन्हा एकदा काढली होती. ते काही वर्षे पुणे कॉलेजमध्ये पहिले प्रिन्सिपॉल (१८५१-५७) व डेक्कन कॉलेजमध्ये (१८६७) प्राध्यापक होते. माझी मराठी क्रमिक पुस्तके, इंडियन पिनल कोड, सिव्हिल नि क्रिमिनल प्रोसिजर कोड यांची मराठी भाषांतरे त्यांनीच केलेली आहेत. शेवटी काही दिवस ते मराठी भाषांतरकारही होते.
— संपादित
संदर्भ :१.
अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्वरशास्त्री