Skip to main content
x

कुलकर्णी, वामन महादेव

       डॉ. वामन महादेव कुलकर्णी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी झाला. संस्कृत व प्राकृत भाषांमध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवून त्यांनी संस्कृतमध्येच पीएच.डी. ही पदवीसुद्धा प्राप्त केली. त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व पारितोषिके मिळाली. त्यांतील विशेष नमूद करण्याजोगी पारितोषिके पुढीलप्रमाणे : .टी. जैनशिष्यवृत्ती, ‘गंगादास रंगीलदासशिष्यवृत्ती, ‘दक्षिणाफेलोशिप इत्यादी.

संस्कृत काव्यशास्त्राच्या क्षेत्रात अनेक विद्वान व्यक्तींनी जरी उत्तम कामगिरी केली असली, तरी प्राकृत भाषेचे या क्षेत्रातील महत्त्व प्रथम डॉ. वा.. कुलकर्णी यांच्याच लक्षात आले. प्राकृत गाथांच्या अध्ययनाशिवाय संस्कृत काव्यशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही हे जाणून त्यांनी त्या दोन विषयांचे साक्षेपी अध्ययन सुरू केले. पीएच.डी. या पदवीसाठी जैन वाङ्मयातील रामकथाहा प्राकृत भाषेतील विषयच त्यांनी निवडला होता. त्यासाठी त्यांनी सर्व जैन रामायणांचा चिकित्सक व विस्तृत अभ्यास केला. रामकथेबाबतच्या विविध प्रश्नांचा सखोल विचार केला. जैन पुराणकथांसह वाङ्मयीन समीक्षा व आस्वादही प्रस्तुत केला आणि वाल्मीकि रामायण आणि जैन रामायणांची तुलना उत्तम प्रकारे पुढे मांडली.

स्टडीज इन जैन लिटरेचरया पुस्तकात जैन लेखकांनी अलंकार शास्त्राला दिलेल्या देणगीचा त्यांनी परामर्श घेतला आहे. तसेच, जैन तत्त्वज्ञान, कथा वाङ्मय, स्त्रियांचे स्थान व तारायणाची सुभाषिते इत्यादींविषयी मौलिक चर्चा केली आहे. या पुस्तकातील लेखनाचा निष्कर्ष असा, की ब्राह्मण तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांमध्ये अनेक भेद असले, तरी स्वनियंत्रण आणि वास्तवाच्या यथार्थ ज्ञानातून मुक्ती या विषयावर सांस्कृतिक एकमत दिसते. जैन सौंदर्यशास्त्राची कल्पना स्पष्ट करून त्यांनी प्राकृत गाथांमधील अपभ्रष्टता दूर केली आहे, ही या क्षेत्रास मोठीच देणगी आहे. त्याशिवाय रामचंद्राच्या मल्लिकामकरंदया नाटकाचा रसास्वाद आणि हरिभद्राच्या समराइच्चकाहाया ग्रंथाचे अध्ययन हे दोन आणखी विशेष होत.

सौंदर्यशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे अनेक निबंध गाजले आहेत. Sanskrit Theory of Beauty’, ‘Bharata’s concept of Bhava’,  Duel Nature of Sattvika-bhava-s’, ‘Rasa and its Pleasurable  Nature’, Hemachandra and Rasa-Tradition’ हे निबंध त्यांच्या विद्वत्तेचे उत्तम नमुने होत. या निबंधांच्या अभ्यासातून कोणत्याही विषयाचा सखोल, साक्षेपी विचार, घाईघाईने निष्कर्ष न काढण्याची वृत्ती, विषयाची सर्व अंगे तपासून पाहण्याची क्षमता आणि असामान्य बुद्धिमत्ता यांचाच प्रत्यय येतो.

त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना विशेष महत्त्वाच्या ठरल्या आहेत. विमलसूरीच्या पउमचरियच्या आवृत्तीला लिहिलेली प्रस्तावना, तसेच माहिंभट्टाच्या व्यक्तिविवेकाच्या प्रा. पटवर्धनांनी काढलेल्या आवृत्तीची प्रस्तावना या अभ्यासकांनी अवश्य वाचण्याजोग्या आहेत. त्याचबरोबर, त्यांनी केलेली पुस्तक-परीक्षणे ही विशेष लक्षणीय आहेत. याचे कारण असे, की केवळ पुस्तकाच्या लेखकाने मांडलेल्या विचारांवरून घाईघाईने पुनर्निरीक्षण न करता पुस्तकाच्या विषयाचा स्वत: अभ्यास करून, अन्य अभ्यासकांची मते लक्षात घेऊन, त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य लोकांपुढे मांडण्याचे त्यांचे कौशल्य प्रशंसनीय होते. भरपूर वाचन, चिंतन आणि मनन या गुणांमुळे त्यांचा प्रत्येक लेख हा अभ्यासाचा आदर्श नमुना ठरला. डॉ. .एन. उपाध्ये यांनी संपादित केलेले सप्तशतिसार’, के. कृष्णमूर्ती यांनी संपादित केलेले वक्रोक्तिजीवित’, तसेच गो.के. भटांनी लिहिलेले Rasa Theory and Allied Problems’  या सर्वांची परीक्षणे त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या नावावर एकूण ५३ पुस्तक-परीक्षणे असून जैनागमों की मूलभाषा’, नीलकंठाचे यादवेन्द्रमहोदयआणि मॅसन व पटवर्धनांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ॅस्थेटिक रॅप्चरया पुस्तकांची पुनर्निरीक्षणे स्वतंत्र लेखांइतकीच अभ्यासपूर्ण आहेत.

डॉ. वा.. कुलकर्णी यांची स्वत:ची ग्रंथसंपदा विपुल आहे. स्वतंत्र पुस्तके : . Bhoja and Harivijay of Sarvasena’, .  Outline of Abhinava Gupta’s Aesthetics,’ . Studies in Sanskrit Sahitya Shastra’ . More Studies in Sanskrit Sahitya Shastra’, . An Anthology of Jain Texts’, . ‘Prakrit Verses in Sanskrit Works’, . A Treasury of Jain Tales,’ . Studies in Jain Literature’ . Abhinavabharati, Text Resorted and other Articles पाच पुस्तक-परीक्षणे, संपादित पुस्तके : १०. गीतगोविंदसंपादित आवृत्ती, ११. उषानिरुद्धमची संपादित आवृत्ती, १२. Natyashastra with the Commentary  of Abhinavgupta, १३. ‘Kumarshatakdvayam’

यांखेरीज अनेकानेक पुस्तकांच्या प्रस्तावना आणि संपादित आवृत्त्यांद्वारे त्यांनी ग्रंथागारात मोलाची भर घातली आहे. त्यांचे १०५ शोधनिबंध प्रकाशित असून या सर्व कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी झाला आहे. वर नमूद केलेल्या पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना पुढील सन्मानही मिळाले आहेत : . Springer’ Research Scholarship {for three years},. Silver Medal of Research- Asiatic Society, Mumbai १९८३, .  President’s Award of Certificate of Honour as Eminent Sanskrit Scholar १९९२, . Honorary Fellowship for Life’s by the Asiatic Society, Mumbai  १९९३, . Acharya Hemachandrasuri Puraskar for Prakrit Works’. सरकारी नोकरीत राहून, एन.सी.सी. ऑफिसर म्हणून काम करून एवढा प्रचंड विद्या व्यासंग करणारी व्यक्ती विरळाच.

डॉ. उमा वैद्य

कुलकर्णी, वामन महादेव