Skip to main content
x

लेवी, सिल्व्हन लुईस

     सिल्व्हँ लेव्ही यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. पॅरिस येथे त्यांचे सर्व शिक्षण  झाले. प्रख्यात फ्रेंच संस्कृत पंडित अबेल बर्ग्ने यांच्या सहवासाने त्यांना संस्कृत भाषा व बौद्ध धर्म यांच्या अध्ययनाची गोडी लागली. १८८९पासून लेव्ही सॉरबॉन येथे संस्कृतचे अध्यापन करू लागले. १८९० साली त्यांनी ‘द इंडियन थिएटर’ (इं.शी.) हा प्रबंध लिहून पॅरिस विद्यापीठाची डी.लिट. पदवी संपादन केली. बर्ग्ने यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागा एशियाटिक सोसायटीच्या काउन्सिलवर लेव्ही यांची नेमणूक झाली. १८९४ साली ‘कॉलेज ऑफ फ्रान्स’मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

     हिंदू नाट्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाने यांच्या या कार्यास सुरुवात झाली. त्यांनी चिनी, तिबेटी, पाली, संस्कृत इत्यादी भाषांचे वर्ग सुरू केले. हिंदी संस्कृतीचे अध्ययन करण्याच्या हेतून त्यांनी एलश्रिश ऋीरलिरळीश व’एुीींशाश जीळशिीं या संस्थेची स्थापना केली.

     त्यांचे शिष्य पेलियट यांनी मध्य आशियात प्रवास करून शोधून आणलेल्या हस्तलिखिताच्या वाचनासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली.

     विख्यात फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ आंत्वान मेये यांच्याबरोबर लेव्हींनी आशियातील चिनी तुर्कस्थानच्या प्रदेशात बोलल्या जाणार्‍या तोखारियन भाषेवर संशोधन कार्य केले. पुढे त्याला सर मार्क ऑरलस्टाइन (कार. १८६२-१९४३) या पुराणवस्तुसंशोधकांच्या संशोधनामुळे पुष्टी मिळाल्याने लेव्हींची सर्वत्र प्रशंसा झाली. १९३३ साली ‘तोखारियन बी’मधील (तोखारियनची पश्‍चिमेकडील बोली) कूचा येथे सापडलेल्या काही ग्रंथांचे अंश त्यांनी प्रसिद्ध केले. (इं.शी. ‘फ्रॅगमेंट्स ऑफ टेक्स्ट्स फ्रॉम कूचा’). त्यांनी १८९७-९८ या कालखंडात भारताचा आणि जपानचा दौरा केला. या दौर्‍यातील अनुभवांतून त्यांचा ‘द डॉक्ट्रिन ऑफ सॅक्रिफाइस इन ब्राह्मणज’ (इं.शी., १८९८) हा ग्रंथ सिद्ध झाला.

     १९२२ साली रवींद्रनाथ टागोरांच्या खास विनंतीवरून त्यांनी विश्‍वभारतीला भेट दिली. इशीसरळसशि रवि खविळरळिीा या निबंधात हिंदुस्थान प्रत्यक्ष पाहण्याची प्रकट केलेली कल्पना सत्यदृष्टीत उतरल्याबद्दल त्यांना फारच समाधान वाटले.

     बौद्ध धर्म आणि संस्कृत भाषा यांचा एकाच वेळी व्यासंग करण्याबद्दल लेव्हींची प्रसिद्धी आहे. एकीकडे ते ‘शाकुंतल’वर व्याख्यान देत, तर दुसरीकडे संस्कृत व चिनी भाषेतील धम्मपदांची चर्चा करत. एकीकडे संस्कृत, तिबेटी व चिनी भाषांतील कोटीकर्णवादनाचा, तर दुसरीकडे महाभारताचा अभ्यास अशा सव्यासाची व्यासंगामुळे त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले.

     समुद्र व पर्वत यामुळे सर्व जगापासून वेगळी झालेली रानटी जात ही हिंदू लोकांबद्दलची कल्पना बदलून टाकणार्‍या पाश्‍चात्त्य संशोधकांत ते प्रमुख आहेत. जावा, कंबोडिया, सुमात्रा, बोर्निओ या दूर देशात हिंदू लोकांनी प्रस्थापित केलेली साम्राज्ये व श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार), सयाम, कंबोडिया, चंपा, जावा इत्यादी देशांतील लिपी, भाषा, वाङ्मय, शास्त्र या सर्व ज्ञानशाखांवर हिंदू - मग ते ब्राह्मण असोत किंवा बौद्ध असोत - लोकांनी गाजवलेले वर्चस्व प्रथम उजेडात आणण्याचे श्रेय त्यांच्या परंपरेला दिले पाहिजे. मुसलमान लोकांनी खूप प्रयत्न करूनही तिकडील हिंदू प्रभुत्व नाहीसे करता आलेले नाही.

     त्यांचे ग्रंथसंपदा अशी आहे - फ्रेंच - (१)le Theatre Indian (1890), (२) La Doctrian du Sacrifice dasn les Barahamanas (1898), (३) Le Nepal (1905) (४) Annales Musee Guimet  (५) Indian (La Grade Encyclopedia मध्ये ) (६) याशिवाय revue Critique Journel T"oung Pao Journel Asiatique ,Eole Francaise d"Extreme Orient च्या  bulletine  मध्ये संशोधनपर लेख.

     इंग्रजी - (१)  what about  Greece Ancient Indian Monument Conserved ,(२) Studies in Buddha Charitra , (३) Docutrine of Sacrifice in Brahmanas 

     संपादित - (१) Sutralankara of Asanga , (२) La Grade Encyclopedia (सहकार्याने )

     ‘नेपाळ : हिस्टॉरिकल स्टडी ऑफ ए हिंदू किंग्डम’ (३ खंड, १९०५-०८, इं.शी.) आणि ‘इंडिया अँड द वर्ल्ड, (१९२६, इं.शी.) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. जगातील विविध राष्ट्रांच्या संदर्भात भारत कोणती भूमिका बजावू शकतो, यासंबंधीची चर्चा त्यांनी ‘इंडिया अँड द वर्ल्ड’ या ग्रंथात केली आहे. १९२१-२३ या कालखंडात त्यांनी अतिपूर्वेकडील देशांचा दौरा केला. त्यातून त्यांचा ‘होबोजिरिन, डिक्शनरी ऑफ बुद्धिझम बेस्ड ऑन चायनीज अँड जॅपनीज सोअर्सिस’ (१९२९, इं.शी.) हा महत्त्वाचा कोश तयार झाला. बौद्ध धर्माचे जपानी पंडित ताकाकुसू जंजीरो यांचे सहकार्य त्यांना लाभले.वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी पॅरिस येथे त्यांचे निधन झाले.

संपादित

संदर्भ
१. मराठी विश्‍वचरित्रकोश; संपादक - कामत, श्रीराम पांडुरंग; विश्‍वचरित्र संशोधन केंद्र, गोवा.

२. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री.
लेवी, सिल्व्हन लुईस