Skip to main content
x

माईणकर, त्र्यंबक गोविंद

       डॉ. त्र्यंबक गोविंद माईणकर हे छात्रप्रिय विद्वान प्राध्यापक आणि कुशल व आश्वासक प्रशासक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संस्कृत व इंग्लिश हे विषय घेऊन बी.ए. ही पदवी मिळविली (१९३५). संस्कृत व अर्धमागधी, आणि मराठी व पाली असे विषय घेऊन दोन वेळा एम.ए.ची पदवी मिळविली (१९३७, १९४२). ‘भरताच्या नाट्यशास्त्रातील संधी व संध्यङ्गे’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली (१९४३) आणि त्याचबरोबर व्ही. एन. मंडलिक पारितोषिकही मिळाले. नंतर मुंबई विद्यापीठाची डी.लिट. ही पदवीही त्यांना मिळाली (१९६२).

     विलिंग्डन महाविद्यालय, सांगली आणि फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे ते संस्कृत-मराठी-पाली या विषयांचे प्राध्यापक होते. विषयाचे सांगोपांग, सखोल, मार्मिक विश्लेषण आणि ओघवती, रसाळ वक्तृत्वशैली यांमुळे त्यांची व्याख्याने नेहमीच ज्ञान, आनंद व प्रेरणा देणारी असत.

     फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पंडित धर प्रोफेसर व पदव्युत्तर-संस्कृत विभाग प्रमुख, दिल्ली विद्यापीठ, रा. गो. भांडारकर प्रोफेसर व पदव्युत्तर संस्कृत-पाली-प्राकृत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ या पदांवर काम करताना प्रशासकीय कामात नियमांचे काटेकोर पालन करत असतानाही आपल्या सौम्य व सौजन्यशील वागणुकीने ते विद्यार्थ्यांमध्ये आणि हाताखालच्या लोकांमध्येही प्रिय होते. प्रशासकीय कामे करत असतानाही आपल्या विषयाचे मनन, चिंतन, संशोधन त्यांनी सतत चालू ठेवले होते. हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या (१७) व संपादित केलेल्या (९) अशा पंचवीसहून अधिक पुस्तकांतून आणि तीसहून अधिक संशोधित निबंधांतून प्रकट झाले आहे. इंग्रजी (१०), मराठी (२), हिंदी (२) आणि संस्कृत (३) अशा चारही भाषांतून त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. संस्कृतमधील एखाद्या विशिष्ट शाखेशी मर्यादित न राहता साहित्य (५), वेद (५), वेदान्त (४) अशा तीन शाखांतील विविध विषयांवर त्यांनी मूलगामी संशोधनात्मक लेखन केले आहे.

     बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती व्ही. एस. अगरवाल, माईणकरांच्या वसिष्ठ रामायणावरील पुस्तकासंबंधी लिहितात, ‘ढहश वळीींळलिीं ाशीळीं षि हळी ुिीज्ञ श्रळशी ळि ींहश षरलीं ींहरीं र्रीींहशी हरी ारिू शिु ींहळसिी ीिं ीरू रवि र्ळिींळींशी ळीीं ीशरवशी ीिं र ीशशिुशव लििीळवशीरींळििी षि ींहश िीलिश्रशाी लििशिलींशव ुळींह ींहश तरीळीींहर ठरारूररि.’ माईणकरांच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत हे खरे आहे. पाली आणि प्राकृत भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे बौद्ध व जैन वाङ्मयाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या ज्ञानाचा संस्कृत वाङ्मयाचे मूल्यमापन करताना त्यांनी विशेष उपयोग केला.

     पालीमधील थेरगाथा, थेरीगाथा, अश्वघोषाचे बुद्धचरित या पार्श्वभूमीवर कालिदासाच्या कुमारसंभवाचे महत्त्व ते विशद करत. हा एक वेगळाच दृष्टिकोन होता. इंग्लिश वाङ्मय आणि आधुनिक पाश्चात्त्य वाङ्मय यांचे मूल्यमापनाच्या चिकित्सा पद्धतींच्या आधारे विश्लेेषण करून प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे एक नवेच रूप त्यांनी अभ्यासकांसमोर ठेवले आहे. चूीींळलळीा ळि ठर्सींशवर, ठर्सींशवळल र्षिीविरींळििी षि लश्ररीीळलरश्र िशिींळली. यांसारख्या पुस्तकांतून ऋग्वेदाचे तत्त्वज्ञानात्मक व साहित्यिक वैशिष्ट्य व महत्त्व नावीन्यपूर्ण रितीने त्यांनी उलगडले आहे. ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहयेद्’ या पारंपरिक विवेचनपद्धतीनुसार ढहश णरिलीाहररि रवि ठर्सींशवर खिींशीिीशींरींळिि, या पुस्तकात अगस्त्य-लोपामुद्रा (१.१७९), मुद्गल-मुद्गलानी(१०.१०२) या सूक्तांचे विवेचन केले आहे. साहित्यातील त्यांचे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक म्हणजे घरश्रळवरीर - हळी रीीं रवि ींर्हिीसहीं. यामध्ये त्यांनी ‘ईश्वरकृष्ण कालिदास’ हा त्यांचा स्वत:चा महत्त्वाचा सिद्धान्त त्यांनी अनेक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केला आहे. सुंदर इंग्लिशमध्ये प्रसन्न शैलीत केलेले कालिदासाच्या सर्व ग्रंथांचे विश्लेषण अतिशय रसपूर्ण व मधुर झाले आहे. सांख्यकारिकेचा कर्ता ईश्वरकृष्ण व रघुवंशादी ग्रंथांचा कर्ता कवी कालिदास हे एकच होत ह्या सिद्धान्ताबद्दल त्यांची खातरी पटली होती. त्यामुळे डरज्ञिहूरज्ञरीळज्ञर ुळींह ॠर्रीवररिवरलहरीूर या सांख्यकारिकेच्या संपादित आवृत्तीच्या प्रस्तावनेत सांख्यकारिकांची काव्यात्मता ते विशेषकरून स्पष्ट करतात. र्डीींवळशी ळि ऊीरारींळल उीळींळलळीा या पुस्तकात ते टीका वाङ्मयाचे महत्त्व अनेक अंगांनी अधोरेखित करतात व टीकांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे हा ‘अक्षम्य अपराध’ आहे असे मत व्यक्त करतात. ‘वैदर्भीय संस्कृत वाङ्मय आणि काव्यशास्त्रीय विचार’ या मराठी पुस्तकात आधुनिक शैलीशास्त्रदृष्ट्या व सौंदर्यशास्त्रदृष्ट्या संस्कृत वाङ्मयाचे मूल्यमापन केले आहे. ‘स्मृतितरङ्गम्’ हे त्यांचे संस्कृत काव्य मराठी ‘विरहतरंगा’ची आठवण करून देते. ‘गायिकाशिल्पकारम्’ या काव्याने ‘सुनीत’ (डििशिीं) हा आधुनिक काव्यप्रकार त्यांनी संस्कृतमध्ये आणला आहे. त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास ‘वासिष्ठ रामायण’, ‘गीताभाष्यप्रकाश’, ‘वैदिक संहिता व उपनिषदे’ या ग्रंथांतून व्यक्त झाला आहे. चरज्ञळसि षि ींहश तशवरिींर हे अप्रतिम पुस्तक त्यांच्या परिणतप्रज्ञेचे फल आहे. त्यांनी अनेक विद्यापीठांतून व्याख्याने दिली. अनेक संस्थांमध्ये अधिकारपदे भूषवली. राष्ट्रीय पंडित, महामहोपाध्याय अशा पदव्यांनी व म. म. काणे सुवर्णपदकांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरवान्वित केले गेले.

     — डॉ. नलिनी चापेकर

माईणकर, त्र्यंबक गोविंद