Skip to main content
x

म्हेत्रे, गणपत

आबासाहेब म्हेत्रे

             णपत म्हेत्रे यांचे शिक्षण काही प्रापंचिक अडचणींमुळे ७वी पर्यंतच झाले. मुळातच शेतीची आवड असल्याने त्यांनी प्रथम खंडाने शेती केली व १९५२मध्ये जिराईत जमीन खरेदी केली. सुरुवातीच्या काळात ऊस, केळी, हळद इ. पारंपरिक पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळविले. त्यांनी १९६०मध्ये द्राक्षाची भोकरी ही जात लावली व पुढे थॉमसन सिडलेस या द्राक्षजातीचे विक्रमी उत्पादन घेण्यात मिळवले. वसंतराव आर्वे, प्रा. दाभोळकर, नामदेव बापू यांचे मौलिक मार्गदर्शन लाभल्याने द्राक्ष लागवडीच्या विकासासाठी वळण देण्याच्या पद्धती, लागवडीचे अंतर, जी.ए. सारखी संप्रेरके देण्याच्या पद्धती, विरळणी, गर्डलिंग या प्रक्रियेमध्ये प्रयोग करून यश मिळवले. ‘वैज्ञानिक द्राक्षकुल’ संस्था स्थापन करून तासगाव चमन ही द्राक्षे प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचप्रमाणे त्यांनी द्राक्ष बाजारपेठांचा आढावा घेऊन द्राक्ष विक्री करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांनी बेदाणा निर्मितीच्या प्रयोगामध्ये यश संपादन केले. पाण्याचा तुटवडा असतानाही क्षारयुक्त पाण्याचा उपयोग करून द्राक्षशेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळविण्यात यश मिळविले. शेतीबरोबरच भारतभर फिरून आंब्याच्या निवडक जातींचा संग्रह केला तसेच नैसर्गिक शेतीमध्ये द्राक्ष, आंबा, बोर इ. फळबागांच्या उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांना १९९६मध्ये ‘फाय फाउण्डेशन, इचलकरंजी तर्फे पुरस्काराने तसेच महाराष्ट्र शासनातर्फे ‘कृषिभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- संपादित

म्हेत्रे, गणपत