नंजुंदय्या, एस. एन.
नंजुंदय्या यांनी १९२२ साली पुणे कृषी महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्रात विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांकाने पदवी प्राप्त केली. १९२६ साली पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे ते पहिले दक्षिण भारतीय विद्यार्थी होते. जुन्या हैदराबाद राज्यामध्ये त्यांनी भात-पैदासकार, कापूस-पैदासकार आणि अर्थ-वनस्पतिशास्त्रज्ञ अशा विविध पदांवर पीक सुधाराचे काम केले. ज्वारी सुधाराच्या त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळातील ८ वर्षे त्यांनी परभणी येथे काम केले.
- संपादित
नंजुंदय्या, एस. एन.