माने, सुबराव श्रीहरी
सुबराव श्रीहरी माने यांचा जन्म बीड येथे झाला. त्यांनी १९७५मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली आणि १९७६मध्ये त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कामास सुरुवात केली. मराठवाडा कृषी विद्यापीठातूनच त्यांनी रोप-पैदास या विषयात पीएच.डी.ची पदवी १९८३मध्ये संपादन केली. डॉ. माने यांनी डॉ. व्याहाळकर आणि डॉ. पाटील यांच्या सहयोगाने एन.एच.एच.४४ या कापसाच्या संकरित वाणाचा विकास केला. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार १९९२मध्ये देण्यात आला, तर १९९५ साली त्यांना वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला.
- संपादित
माने, सुबराव श्रीहरी