Skip to main content
x

पेंडसेे, माधव लक्ष्मण

     माधव लक्ष्मण पेंडसे यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या राममोहन हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयमध्ये आणि कायद्याचे शिक्षण शासकीय विधि महाविद्यालयामध्ये झाले. एलएल.बी.ची पदवी संपादन केल्यावर त्यांनी २ऑगस्ट१९५८ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. दिवाणी, फौजदारी आणि रिट असे सर्व प्रकारचे खटले त्यांनी यशस्वीरीत्या लढविले. २५जानेवारी१९७८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पेंडसे यांची नियुक्ती झाली. ११जानेवारी१९७९ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १एप्रिल१९९५ रोजी न्या.पेंडसे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २८जुलै१९९५  रोेजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. २५मार्च१९९६ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तल्लख बुद्धिमत्ता आणि खटल्यांचे निकाल त्वरित देऊन चोख न्यायदान करण्याची हातोटी याबद्दल न्या.पेंडसेंचा लौकिक होता.

- शरच्चंद्र पानसे

पेंडसेे, माधव लक्ष्मण