Skip to main content
x

पेटीगारा, कावसजी जमशेटजी

        कावासजी जमशेटजी पेटीगारा हे गुप्तहेर खात्याचे पहिले भारतीय प्रमुख होते. त्यांचा सेवाकाळ १९०३-१९३८ होता. ते गुप्तहेर खात्यामध्ये सफेदवाला म्हणून ओळखले जात असत. १९२८मध्ये ते मुंबईचे उपायुक्त झाले. या पदावर त्यांनी दहा वर्षे काम केले. ते अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते.

        महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर विलक्षण विश्‍वास होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा जेव्हा म. गांधीजींना अटक करण्यात आली तेव्हा ‘मी फक्त पेटीगारा यांच्याकडूनच अटक करून घेईन,’ अशी अट गांधीजींनी घातली होती. पेटीगारा हे मुंबईत सामान्य जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय अधिकारी होते. पेटीगारा यांनी जनतेची नाडी चांगली ओळखली होती. मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाजवळ जनतेच्या प्रयत्नांमधून त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्रावणकोरचे दिवाण रामस्वामी अय्यर यांनी पुढाकार घेऊन जनतेच्या सहकार्याने पेटीगारा यांचा पारशी डगल्यामधील उभा केलेला हा पुतळा आजही त्यांच्या शानदार कर्तृत्वाची आठवण करून देतो.

- संपादित

पेटीगारा, कावसजी जमशेटजी