Skip to main content
x

फडके, हरी अनंत

       री अनंत फडके यांचा जन्म वाराणसी येथे कोजागिरी पौर्णिमेस झाला. अनंतशास्त्री यांच्या विद्वत्तेची कीर्ती देशभर पसरली होती. विनोबाजींच्या कानावरही त्यांची कीर्ती पोहोचली होती. गीता प्रवचने सर्व भारतीय भाषांत रूपांतरित करून प्रसिद्ध करावीत अशी विनोबाजींची योजना होती. संस्कृत भाषांतराची जबाबदारी त्यांनी अनंतशास्त्रींवर सोपविली होती. ती त्यांनी कोणतेही मानधन न घेता समर्थपणे पार पाडली. गोळवलकर गुरुजींनी अनंतशास्त्रींकडून मनुस्मृती लिहून घेतली व ती पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, विनोबाजी, आचार्य दादा धर्माधिकारी, सेतू माधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, गोळवलकर गुरुजी, मोरोपंत पिंगळे यांच्या प्रभावामुळे हरी अनंत फडके यांना बालपणापासूनच एक विशाल दृष्टी प्राप्त झाली.

     वाराणसीत त्यांचे वास्तव्य दोन वाड्यांत झाले. एक नाना फडणवीसांचा अन् दुसरा वाडा पंत प्रतिनिधींचा.

     फाउंडेशन फॉर न्यू एज्युकेशन, राजघाट येथे त्यांनी प्रदीर्घ काळ अध्ययन केले. तसेच मीरत कॉलेज, मीरत; काशी हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी व कुरुक्षेत्र महाविद्यालय, हरियाणा येथे अध्ययन व अध्यापन, संशोधन कार्य करून त्यांनी मोठे नाव मिळवले. बनारस हिंदू विश्वविद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९५५ साली इतिहास विषयात एम.ए., १९९२ साली प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाची एम.ए. पदवी त्यांनी प्राप्त केली. सन १९६६ साली त्यांनी ‘त्रिकोणात्मक संघर्ष’ या विषयावर प्रबंध पूर्ण करून पीएच.डी. प्राप्त केली. या काळात त्यांचे प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्याशी संबंध आले.

     डॉ. फडके कुरुक्षेत्र विश्वविद्यालयात भारत इतिहास संशोधन व पुरातत्त्व विभागाचे अध्यक्ष आणि प्राच्य विद्या संकल्पाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. त्यांनी रशिया व विद्यापीठ आयोग यांची फेलोशिप प्राप्त केली. हिंदी आणि मराठी भाषांतील निपुणतेमुळे विविध प्राचीन शाखांमध्ये संशोधन, निर्देशन करून त्यांनी शंभराहून अधिक शोधनिबंध, विविध शोधपत्रिकांतून व ग्रंथांतून प्रकाशित केले होते. त्यांनी लिहिलेले रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे चरित्र नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीने प्रकाशित केले.

     ’कळीीिीूं षि र्र्घीीीज्ञीहशीींर’ आणि ’करीूररि अलिळशिीं रवि चशवळर्शींरश्र’, ‘महाराष्ट्र ऐतिहासिक व सांस्कृतिक चिंतन’ या त्यांच्या ग्रंथांनी त्यांना विशेष प्रसिद्धी प्राप्त झाली.

     भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवायला हवे, इतिहासाच्या संदर्भात ‘रामदास व तुलसीदास’ तसेच ‘भारतीय इतिहास अभ्यासक्रमाची संकल्पना’ या ग्रंथांनी मराठी विश्वात व इतिहास क्षेत्रात विशेष भर टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. या विषयावर त्यांनी ५३ लेख लिहून एक विक्रमच केला.

     सेवानिवृत्तीनंतर १० वर्षे त्यांनी नाशिकला स्थायिक होऊन अनेक स्नेहबंध निर्माण केले.

     ‘इतिहास म्हणजे काय?’, ‘राष्ट्रीय जीवनात शिक्षकांचे योगदान’, ‘स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर’, ‘जनस्थान’, ‘जिजाबाई’, ‘रामदास’, ‘अहिल्याबाई होळकर’ इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी आपल्या व्याख्यानांद्वारे सुंदर विचार मांडले. कुरुक्षेत्र विद्यापीठात असताना पानिपत स्मारक उभारावे यासाठी हरियाणा सरकारकडे त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, आज ते पूर्ण झाले आहे.

     याच विद्यापीठात दोन पदांवर काम करत असताना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘मराठ्यांचा इतिहास’ हा विषय त्यांनी सुरू केला. अनेक विद्यार्थी व शिक्षक या विषयाचा सखोल अभ्यास आजही करत आहेत.

     ‘लुप्त सरस्वती’ हा त्यांचा चिंतनाचा विषय होता. कै.मा. मोरोपंत पिंगळे यांनी सरस्वती शोध प्रकल्प हाती घेतला, तेव्हा हरी अनंत फडके यांचाही त्यात सहभाग होता. इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प साकार करण्यासाठी ते मदत व मार्गदर्शन करत असत.

     — डॉ. अरुणचंद्र पाठक

फडके, हरी अनंत