Skip to main content
x

फ्लीट, जॉन फेथफुल

    जॉन फेथफुल फ्लीट हे लंडनच्या मर्चन्ट्स टेलर स्कूल व युनिव्हर्सिटी कॉलेजमधून आपले शिक्षण संपवून इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये शिरले. हिंदुस्थानामध्ये येणार्‍या माणसाला त्या वेळी आवश्यक समजल्या जाणार्‍या संस्कृत भाषेचे जुजबी शिक्षण घेऊन १८६८मध्ये ते हिंदुस्थानात आले.

     मुंबई प्रांतात आल्यावर यांनी असिस्टन्ट कलेक्टर, एज्युकेशनल इन्स्पेक्टर, हिंदुस्थान सरकारच्या एपिग्रफिकल डिपार्टमेन्टचे पहिले प्रमुख, कस्टम्स कमिशनर अशी अनेक कामे केली. कार्यनिवृत्तीनंतर १८९७मध्ये ते एलिंग येथील आपल्या निवासस्थानी कार्यमग्न झाले. रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते कित्येक वर्षे सेक्रेटरी होते. त्यांच्या संशोधनकार्याबद्दल १९१२मध्ये त्या संस्थेने त्यांना सुवर्णपदक दिले.

     ‘झरश्रळ, डरिीज्ञीळीं रवि जश्रव घररिीशीश खिीलीळिींळििी’ हा यांच्या शिलालेखसंग्रहातील पहिला महत्त्वाचा ग्रंथ होय. सहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंतचा दक्षिण हिंदुस्थानाचा सुसंगत इतिहास सादर करणार्‍या शिलालेखांचा संग्रह पूर्वी अनेकांनी केला होता. परंतु अद्ययावत माहितीचा उपयोग करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, त्यांचे हे संपादन विशेष यशस्वी ठरले. सरकारी मदतीच्या अपूर्णतेमुळे या ग्रंथाच्या फक्त नऊच प्रती छापण्यात आल्या.

     खिीलीळिींळििी षि ींहश एरीश्रू र्ॠीिींर घळसिी रवि ींहशळी र्डीललशीीिीी या आपल्या ग्रंथात त्यांनी गुप्तकालीन ८१ शिलालेख त्यांच्या इंग्लिश अनुवादासह प्रसिद्ध केले. राजपुतान्यांपैकी गंगाधार (झालवड राज्य) येथे मिळालेला (सन ४३२) व विजयगढ येथे मिळालेला यौधेयांचा व विष्णुवर्धनाचे (३७०) हे या ग्रंथात देण्यात आलेले शिलालेख विशेष महत्त्वाचे आहेत. परंतु यापेक्षाही गुप्तराजांची कालनिश्चिती हा या ग्रंथाचा प्रमुख विशेष होय. हिंदी व परदेशी कालगणनापद्धतीतील फरकामुळे जुन्या इतिहासातील कालक्रम ठरवणे मुश्किल होई. त्यातही गुप्त घराण्याच्या इतिहासात वीसपेक्षा अधिक कालपद्धतींच्या झालेल्या गल्लतींमुळे ते काम विशेष कठीण झाले. अशा स्थितीत यांनी प्रथम मन्दॅसोर शिलालेखावरून व नंतर केरो लक्ष्मण छत्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या दोन कालगणनापद्धतींची सांगड घालणार्‍या कोष्टकांवरून गुप्त राजांची सुरुवात ३१९-३२० ठरवली. पुढे का.बा. पाठक यांनी जैन ग्रंथांच्या साहाय्याने काढलेल्या निष्कर्षाने त्यांच्या या सिद्धान्ताला पुष्टीच दिली. ‘ढहश ऊूरिीींळशी षि घररिीशीश ऊळीीींळलीीं’ हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ होय. कॅम्बेलने प्रसिद्ध केलेल्या मुंबई गॅझेटियरच्या पहिल्या खंडातील दुसरा भाग म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. हिंदुस्थानच्या पश्चिम भागातील जाती-पोटजातींची संगतवार माहिती पुरवणारा असा ग्रंथ प्रथमच झाला.

     परंतु यापेक्षाही ‘इंडियन अ‍ॅन्टिक्वेरी’, ‘अर्किऑलॉजिकल रिपोटर्स ऑफ वेस्टर्न इंडिया’ व ‘एपिग्रफिया इंडिका’ यातून त्यांनी केलेले स्फुट लिखाण विशेष महत्त्वाचे आहे. बर्‍याच शिलालेखांचे अनुवाद त्यांनी प्रसिद्ध केले. इंडियन अ‍ॅन्टिक्वरीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली शिलालेखांविषयीची लेखमाला विशेष महत्त्वाची आहे. शिलालेखांवरील रंग पुसण्यापासून ते थेट त्यांचा अनुवाद करेपर्यंतची सर्व माहिती त्यात देण्यात आली आहे. ते १८८५-१८९१ या कालावधीमध्ये सहा वर्षे इंडियन अ‍ॅन्टिक्वरीचे संपादक होते .

     दिल्ली व अलाहाबाद येथील अशोकाच्या स्तंभलेखांच्या मूळ प्रती व त्यांच्या अनुवादाचे प्रकाशन हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य होय. हिंदुस्थानातील गावांची नावे व त्यांची पूर्वठिकाणे ही संशोधनशाखा आयुष्याच्या शेवटी त्यांचा विचारविषय झाली होती. देशी व परदेशी भाषांवरील अजोड प्रभुत्व व केवळ अभ्यासकाची दृष्टी ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत यांमुळे हिंदी शिलालेखांच्या ज्ञात्यांतील प्रमुख स्थानास ते पोहोचले. आयुष्याच्या अगदी शेवटच्या कालखंडातही आपल्या ग्रंथातील चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या नव्या आवृत्त्या काढण्याची तळमळ त्यांना लागली होती.

- संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
फ्लीट, जॉन फेथफुल