रावदेव, अशोककुमार भानुदास
अशोककुमार भानुदास रावदेव यांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली या लहान गावात झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले शालेय शिक्षण घेतले. त्यांनी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून १९५६मध्ये बी.एस्सी. (कृषी), तर १९५९मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवल्यावर मॉस्को येथून कीटकशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी प्रथम साहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला १९६१-६२ला सुरुवात केली. त्याच्या जोडीने त्यांनी कॉमनवेल्थ इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल, बेंगलोर येथे वरिष्ठ कीटक संशोधन साहाय्यक या पदावर काम केले. याच वेळी १९६९-७० या काळात पूल ऑफिसर या पदावर नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात संशोधन कार्य केले. या अनुभवावर त्यांनी १९७० ते १९८५मध्ये परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठात प्राध्यापक व कीटकशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केले. पुढे १९९५पर्यंत सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य म्हणून तेथेच त्यांच्या कामाची वृद्धी झाली. १९७० ते ७४मध्ये हुमणी या किडीवर सविस्तर संशोधन करून तिच्या नियंत्रणासंबंधी विशेष शिफारशी करण्यात आल्या आणि याचा वापर संपूर्ण देशात व महाराष्ट्रात करण्यात आला हे विशेष आहे. या किडीचा प्रयोग नांदेड जिल्ह्यातील रातोळी गावाच्या संपूर्ण परिसरात १००० हेक्टर क्षेत्रावर यशस्वीपणे करून दाखवला आणि या शोधाची नोंद देशात व परदेशात शोधपत्रिकांमधून घेतली गेली. त्यांचे १०० शोधनिबंध देश-विदेशांतील नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थी उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या कार्यासाठी त्यांनी हवाई बेटे, सायप्रस, रशिया व युरोपीयन देशांना भेटी देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले. या शोधामुळे त्यांनी भा.कृ.अ.सं., दिल्ली यांच्यातर्फे समन्वयक म्हणून सात-आठ वर्षे कार्य केले. दिल्ली येथे कृषी कीटक व कृमी या संस्थेचे ३ वर्षे काम पाहिले.
अशोककुमार रावदेव यांच्या पत्नी हिंदी विषयात जबलपूर विद्यापीठाच्या एम.ए. आहेत आणि त्यांनी हिंदुस्थानी गाण्यात मध्य प्रदेशातील खैराघर घराण्यातील गुरूंकडून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या आकाशवाणी कलाकार
- विनया वाळिंबे