Skip to main content
x

सय्यद, खुर्शीद हाशम

             य्यद खुर्शीद सय्यद हाशम यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. कापूस, ज्वारी, तूर या पारंपरिक पिकांव्यतिरिक्त त्यांनी आवळा या पिकाची शेती करणे जास्त पसंत केले. त्यांनी आवळ्याच्या एन ६ व ७ आणि कृष्णा या वाणांची २ एकर क्षेत्रामध्ये लागवड करून लक्षणीय पीक घेतले. उत्पादित आवळ्यांवर प्रक्रिया करून सय्यद आवळा लाडू, आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा लोणचे आणि आवळा केस तेल यांसारखे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी आवळ्याप्रमाणे बीट रूट प्रकल्पात बीटाच्या कंदापासून वेगवेगळी उत्पादने तयार करण्याचा मानस ठेवला. 

              सय्यद खुर्शीद यांना कृषिभूषण व शेतिनिष्ठ असे दोन पुरस्कार २००६मध्ये मिळाले. त्यांच्या कामासाठी भारत कृषक समाजातर्फे त्यांना गौरवले होते. तसेच महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आवळा प्रक्रियेचे उद्योजक म्हणून त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

- प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

सय्यद, खुर्शीद हाशम