Skip to main content
x

तेजिंदरसिंग, हरबन्ससिंग

     तेजिंदरसिंग यांचा जन्म पुणे येथे झाला. फिरोजपूर येथे आर.एस.डी. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ते दि. १५ मार्च १९७० या दिवशी ‘१०४ इंजिनिअर रेजिमेंट’ मध्ये दाखल झाले. दि. ९ डिसेंबर १९७१ या दिवशी शक्करगढ परिसरातील सुरुंग क्षेत्राची टेहळणी करण्यासाठी त्यांना प्रमुख नेमण्यात आले. बंदुका आणि तोफखान्यांची तुकडी यांच्या सहाय्याने त्यांनी ही कामगिरी पार पाडून शत्रूची अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळवली. जो मार्ग सुरुंगामुळे खराब झाला होता, तो मार्ग त्यांनी एकट्याने मोकळा करून तो दुरुस्त करण्यास मदत केली. दि. ९ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरचक्र पुरस्कार जाहीर झाला.
-संपादित

तेजिंदरसिंग, हरबन्ससिंग