टकले, मनोहर माधव
मनोहर माधव टकले यांचा जन्म पुण्यात झाला. दि. १० जुलै १९५० रोजी ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. मनोहर टकले हे भारतीय हवाई दलात स्क्कॉड्रन लीडर या पदावर कार्यरत होते. कटांगमधील शत्रूच्या हवाई हालचाली, हवाईतळ यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे कार्य ‘कॅनबेरा’ या लढाऊ विमानाद्वारे करण्याची कामगिरी टकले यांच्यावर सोपवण्यात आली.
या कामात अनेक वेळा त्यांच्या लढाऊ विमानावर शत्रूने हल्ला केला. विमानावर करण्यात आलेल्या गोळीबारातील एका गोळीने टकले जखमी झाले. परंतु, तशाही अवस्थेत त्यांनी आपल्या लक्ष्याचा पाठलाग करून शत्रूच्या हवाईतळांचा संपूर्ण बीमोडकरण्याचे महत्वाचे काम केले. कामगिरी पार पाडून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतरच त्यांनी स्वतःवर ओढवलेल्या बिकट प्रसंगाची कल्पना आपल्या वरिष्ठांना दिली. अत्यंत निष्ठेने आणि शौर्याने आपली कामगिरी पार पाडणाऱ्या मनोहर टकले यांच्या शौर्याचा यथोचित गौरव करून त्यांना ‘वीरचक्रा’ने सन्मानित करण्यात आले.
-संपादित