Skip to main content
x

जाधव, धोंडू गोविंद

     धोंडू गोविंद जाधव यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बामणोली देवरुख या गावी झाला. २० नोव्हेंबर १९४१ रोजी सैन्यदलात प्रवेश करून पहिल्या महार फलटणीमध्ये त्यांनी सेवेस सुरुवात केली. १९४८ च्या पाकिस्तानच्या युद्धादरम्यान पायदळाच्या  कुमाऊं फलटणीबरोबर मध्यम पल्ल्याची मशीनगन चालवण्याच्या कामी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
      
१४ एप्रिल १९४८ रोजी पुढे सरकणाऱ्या फलटणीवर जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी  भागात शत्रूने स्वयंचलित तोफखान्यासह जोरदार हल्ला चढवला. शिपाई धोंडू जाधव यांनी मोठ्या कल्पकतेने एक टेकडीवर मोर्चा धरून शत्रूवर गोळीबार करण्यास प्रारंभ केला. या सर्व धुमश्चक्रीदरम्यान त्यांचा दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला. तरीदेखील शिपाई धोंडू जाधव यांनी मोर्चा सांभाळून गोळीबार चालू ठेवला. व शत्रूचा हल्ला परतवून लावला.शिपाई धोंडू जाधव यांनी जे असामान्य निष्ठा आणि संयमित धैर्याचे प्रदर्शन घडवले, त्याबद्दल त्यांना १५ नोव्हेंबर १९४८ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
-संपादित

जाधव, धोंडू गोविंद