Skip to main content
x

सावंत, अरविंद विनायकराव

      रविंद विनायकराव सावंत यांचे शिक्षण बी.कॉम आणि एलएल.एम. या पदव्यांपर्यंत औरंगाबाद येथे झाले. ८जानेवारी१९६० रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. १९७० ते १९७६ पर्यंत त्यांनी कायद्याचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. १९७४ ते १९७७ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत ‘पब्लिक प्रॉसिक्यूटर’ आणि सहायक सरकारी वकील होते. केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनलवरही ते काही काळ होते. १२ मार्च १९८२ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे ‘अ‍ॅडव्होकेट-जनरल’ म्हणून झाली. ६जानेवारी१९८७ रोजी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १नोव्हेंबर१९८८ रोजी त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारचे विशेष वकील म्हणून झाली. जुलै१९९० पर्यंत ते त्या पदावर होते.

      ३०जुलै१९९० रोजी न्या.सावंत यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. ३ऑक्टोबर१९९१ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ३०मे२००० रोजी त्यांची नियुक्ती केरळ उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. १६सप्टेंबर२००० रोजी ते त्या पदावरून निवृत्त झाले. सध्या ते दिल्ली येथे वकिली करतात.

- शरच्चंद्र पानसे

सावंत, अरविंद विनायकराव