'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश, युवाविवेक, श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा वक्तृत्व स्पर्धा
मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून युवाविवेक, शिल्पकार चरित्रकोश आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाविद्यालयीन युवांसाठी वक्तृत्व स्पर्धा २०२४' दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या नियोजित वेळेत संपन्न झाली. या स्पर्धेसाठी पुण्यातील विविध महाविद्यालयातून कनिष्ठ, वरिष्ठ आणि पदव्युत्तर गटातील स्पर्धक सहभागी झाले होते.
१) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
२)अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माझी जबाबदारी.
३)म्हणून मला मराठी असल्याचा अभिमान आहे.
हे स्पर्धेसाठी विषय देण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण हे त्यातील विषयांची मांडणी, शैली, प्रभाव या निकषांच्या आधारावर जयश्री काटीकर आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांनी केले. युवाविवेक आणि शिल्पकार चरित्रकोश आयोजित प्रेमकथा लेखन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे तसेच मराठी राजभाषादिनानिमित्त घेण्यात आलेल्या महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेतील इ. ५ वी ते ७ वी या गटाचे बक्षीस वितरण स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे संध्या. ५ ते ७ या वेळी करण्यात आले. समारंभासाठी प्रसिद्ध गीतकार वलय मुळगुंद, दिग्दर्शक रश्मी देव, वकृत्व स्पर्धेचे परीक्षक जयश्री काटिकर, डॉ. सोनाली घाटणेकर हे मान्यवर उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक : तेजस पाटील
द्वितीय क्रमांक : पार्थ जोशी
तृतीय क्रमांक : साईराज घाटपांडे
उत्तेजनार्थ क्रमांक : पूर्वा हडवळे आणि मुग्धा सुरनीस
प्रेमकथा लेखन स्पर्धेमध्ये दर्श सामंत याच्या 'भेट' या कथेला प्रथम क्रमांक मिळाला. 'सी-शोअ्...!' (किनारा.....!) या उत्कर्षा चित्ते हीने लिहिलेल्या कथेला द्वितीय क्रमांक मिळाला, तर जगाला प्रेम अर्पावे आणि एक कहाणी अशी ही या अनुक्रमे मिता साटम आणि मनाली देशपांडे यांनी लिहिलेल्या कथेला तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी तावडे हिने केले होते.