नाट्य खंड प्रकाशन सोहळा ७ जानेवारी २०२४
अमृतमहोत्सवी साप्ताहिक विवेकने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने हाती घेतलेल्या 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. राज्य मराठी विकास संस्था आणि दादासाहेब फाळके चित्र नगरी, फिल्मसिटी यांच्या सहयोगाने प्रकल्पातील 'नाट्यकोश' हा अकरावा खंड. या खंडाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड येथील शतकोत्सव नाट्य संमेलनात मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले.महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीची ओळख करून देण्यापासून भविष्यकालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यापर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे.
नाट्य खंड प्रकाशन सोहळा ७ जानेवारी २०२४