Skip to main content
x

उटगीरकर, नारायण बापुजी

       नारायण बापूजी उटगीकर एम.. झाल्यानंतर प्रथम सरकारी हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून नोकरीस लागले. तेथून पुणे डेक्कन कॉलेजमध्ये ग्रंथालयात त्यांनी काम केले. त्यानंतर काही वर्षे ते पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मानद कार्यवाह होते (१९१६-१८). तेथेच हस्तलिखिताच्या संग्रहाचे ते क्युरेटर झाले. (१९१८-१९१९) त्यानंतर महाभारताची चिकित्सक प्रत तयार करण्याचे काम तेथेच सुरू झाले. उटगीकर यांना या प्रकल्पाचे मुख्य संपादक नेमण्यात आले. (१९१९-१९२४). त्याप्रमाणे त्यांनी नमुना म्हणून विराटपर्व’  खंड काढला. सर डॉ. रा.गो. भांडारकर यांच्या लेखसंग्रहाचे चार भाग निघाले, त्याचे संपादकत्व उटगीकर यांच्याकडेच होते. त्यांनी जर्मनीतील पंडित रिचर्ड गार्बे यांच्या भगवद्गीतेच्या प्रस्तावनेचे इंग्रजी भाषांतर केले. तसेच गौडवहोया ग्रंथाची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. त्यांना स. १९२७ साली अर्धांगवायू झाला.

संपादित

उटगीरकर, नारायण बापुजी