Skip to main content
x

दीक्षित, कृष्ण गंगाधर

त्तराचा फाया तुम्ही मला आणा रायाकिंवा चाळ माझ्या पायात पाय माझे तालातया चित्रपटगीतांची माहिती नाही, असा मराठी रसिक सापडणार नाही. पण कवी संजीवहे या गाण्यांचे गीतकार होते, हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसेल. कवी संजीव १९३५ सालापासूनच कविता लिहीत होते. मात्र १९५५ सालापासून ते चित्रपटगीते लिहू लागले. केवळ चित्रपटगीतेच नव्हे, तर सासर-माहेर,’ ‘भाऊबीज, ‘चाळ माझ्या पायात’, ‘पाटलाची सूनअशा निवडक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. त्यापैकी पाटलाची सून’ (१९६७) या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेचा राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. १९८० मध्ये गझल गुलाबया कवितांसाठी त्यांना शासनाने पुरस्कार दिला.

कवी संजीव यांचे पूर्ण नाव होते कृष्ण गंगाधर दीक्षित. सोलापूरजवळच्या वांगी या गावी त्यांचा जन्म झाला. सोलापूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि पुढे मुंबईला जाऊन त्यांनी जी.डी.आर्ट्स ही पदवी संपादन केली. चित्रकार, छायाचित्रकार म्हणून सोलापुरात त्यांची कला बहरली. नवी पेठ या सोलापुरातल्या अत्यंत गजबजलेल्या भागात त्यांचा सुसज्ज स्टुडिओ होता आणि या स्टुडिओत अनेक कलाकारांची सतत ये-जा असे.

१९३५-१९८८ या काळात संजीव यांचे बारा कवितासंग्रह प्रकाशित झाले. सुख आले माझ्या दारी’, ‘मराठा तितुका मेळवावा,’ ‘रंगपंचमी,’ ‘सुधारलेल्या बायका,’ ‘वाट चुकलेले नवरे,’ ‘जन्मठेप,’ ‘हात लावीन तिथे सोने,’ ‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘जखमी वाघीण’, ‘ठकास महाठक’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘ग्यानबाची मेखया चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले. याखेरीज अनेक गैरफिल्मी गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या नावावर सापडतात. मराठा तितुका मेळवावाचित्रपटातील अखेरचा हा तुला दंडवतहे गीत कवी संजीव यांनीच लिहिले होते. मात्र या गाण्याचे श्रेय अनवधानाने योगेश यांना दिले आहे. ७८ आर.पी.एम. ध्वनिमुद्रिकेवर संजीव यांचे नाव स्पष्ट दिसते.

सोलापूरच्या लोकजीवनाची, लावणीची परंपरा कवी संजीव यांच्या गीतांनी कायम लक्षात राहील.

त्यांचे वार्धक्याने सोलापुरातच निधन झाले.

- जयंत राळेरासकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].