Skip to main content
x

कुर्डूकर, सुधाकर पंडितराव

    सुधाकर पंडितराव कुर्डूकर यांचा जन्म मुंबईला झाला. ३१ ऑगस्ट १९६१ पासून ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करू लागले. ते मुख्यत: अपील शाखेत दिवाणी व फौजदारी खटले चालवीत असत. त्याचप्रमाणे रिट अर्जांचेही काम करीत असत. सुधाकर कुर्डूकर यांनी कायद्याचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणूनही काम केले. नंतर त्यांची नियुक्ती सहायक सरकारी वकील म्हणून झाली.

२५एप्रिल१९७८ रोजी त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि ११जानेवारी रोजी कायम न्यायाधीश म्हणून झाली. १६जानेवारी१९९४ रोजी त्यांची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी २९मार्च१९९६ रोजी त्यांची नियुक्ती झाली. १५जानेवारी२००० रोजी ते पदावरून निवृत्त झाले.

- शरच्चंद्र पानसे

कुर्डूकर, सुधाकर पंडितराव