Skip to main content
x

पाटील, विनायक पुंडलिक

विनायक पुंडलिक पाटील यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंदेवाडी या खेड्यात 250 एकर बागायती जमीन असलेल्या सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्यावर बालपणीच शेतीकामाचे संस्कार झाले. शेती व्यवसायासोबतच त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली.

पाटील यांनी 1963 मध्ये राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. ते 1978 मध्ये मंत्री झाले. मंत्रिपद मिळाल्यानंतरही त्यांनी साहित्य, संगीत व शेती या विषयातील आपले छंद जोपासले. त्यांनी वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही समर्थपणे सांभाळले. परंतु त्याच दरम्यान त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला व वनशेतीवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. त्यांनी 1983 पासून निलगिरी लागवडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी गुजरातपासून गढवालपर्यंत प्रवास केला व निलगिरी प्रकल्प हाती घेतला. सहकारी साखर कारखान्याचे सहकार्य घेऊन निलगिरी प्रकल्प राबवला तर तो ऊसापेक्षाही अधिक फायदेशीर ठरतो, हे त्यांनी दाखवून दिले. निलगिरीची शेती शास्त्रोक्त पद्धतीने करता यावी आणि शेतकर्यांनी उत्पादन केलेल्या निलगिरीला योग्य भाव मिळावा या उद्देशाने पाटील यांनी 20 मार्च 1983 रोजी जिल्हा निलगिरी उत्पादक सहकारी संस्था, मर्यादितची नोंदणी केली. या संस्थेमध्ये त्यांनी निलगिरी झाडांची लागवड करणार्या 2311 सभासदांना सहभागी करून घेतले आणि 3984 हेक्टर क्षेत्रावर 1.44 कोटी निलगिरी झाडांची लागवड करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

पाटील यांनी वापरलेल्या तंत्रामुळे चांगले उत्पादन तर होतेच, पण खारेपड जमिनीही शेतीयोग्य होतात, हे सिद्ध झाले. ही संस्था आदर्श ठरल्याने राज्यभरात 25 हून अधिक ठिकाणी त्या धर्तीवर संघ स्थापन केले. या सर्व संघांनी मिळून 1990 मध्ये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रॅग्रो फॉरेस्ट्री फेडरेशनची स्थापना केली. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच संघटना आहे. इजिप्तमध्येही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईल नदीच्या खोर्यात झाडे लावण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. अहमदाबादच्याआयआयएमने आपल्या कृषी व्यवस्थापन केंद्राचे सदस्यत्व त्यांना बहाल केले. निलगिरीप्रमाणेच त्यांनी विलायती एरंड (जट्रोफा) चा पर्यायी पिकाची ओळख करून दिली.

पाटील यांना वनशेतीप्रमाणेच साहित्य व नाटक या विषयांमध्येही रस होता. म्हणूनच महाराष्ट्रातील पुलोदच्या मंत्रिमंडळात पाटील सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री होते. उर्दू साहित्य व गझल यांचाही त्यांनी अभ्यास केला होता.

- संपादित