पाटील, रंगराव शंकर
रंगराव शंकर पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सेनोली शेती प्रक्षेत्रावर कामास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्रावर काम केले. पुढे ते कृषिविद्यावेत्ता या पदावर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे रुजू झाले. श्रीराम को.ऑप. शुगर फॅक्टरी - फलटण, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर येथेही त्यांनी केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण होते. ओरिसा येथील श्रीराम ग्रुपच्या दोन साखर कारखान्यांच्या उभारणीत पाटील यांचा सहभाग होता, तर येथेच त्यांनी ४०,००० एकर क्षेत्रावर ऊस विकासाचा कार्यक्रमही राबवला. नेपाळमधील दोन साखर कारखान्यांवर पाटील यांची ऊस सल्लागार म्हणून नेमणूक झालेली होती, तर म.फु.कृ.वि.त उपसंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. अॅग्रो कन्सलटन्सी ही संस्था कोल्हापूर येथे मानसिंगराव जाधव व अवधूत जोशी यांच्यासोबत स्थापन करून कार्यान्वित केली आहे.
- संपादित