Skip to main content
x

साळुंके, पांडुरंग बाळकृष्ण

     पांडुरंग बाळकृष्ण साळुंके यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मानेराजुरी या गावी झाला. १९७०मध्ये ते भूसेनेत दाखल झाले.

     १९७१च्या पाकिस्तान युद्धात साळुंके यांचा सहभाग होता. त्या वेळी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या एका बटालियनने चिलखती दलाच्या सहाय्याने शत्रूवर चाल केली असता शत्रूच्या रणगाड्यांना धोका निर्माण झाला. या वेळी आपला जीव धोक्यात टाकून शिपाई पांडुरंग साळुंके यांनी शत्रूच्या अग्निबाण प्रक्षेपकावर हल्ला केला. शत्रूच्या स्टेनगनचा गोळीबार खूप जवळून होत असतानाही त्यांनी शत्रूवर उडी मारून तो अग्निबाण प्रक्षेपक अक्षरश: हिसकावून घेतला.

     या कामगिरीच्या वेळी शिपाई साळुंके यांनी दुर्दम्य धैर्य व उच्च दर्जाचा निर्धार प्रदर्शित केला. त्यांना मरणोत्तर ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

- संध्या लिमये

साळुंके, पांडुरंग बाळकृष्ण