Skip to main content
x

     कोणिसावे व विसावे शतक हे भारताचे प्रबोधनपर्व मानले जाते. भारतातील प्राचीन संस्कृती आणि पाश्‍चात्त्य देशांतून आलेली आधुनिकता यांच्या परस्पर संवांदातून आणि समन्वयातून जीवनाच्या विविध क्षेत्रांत मूलभूत परिवर्तन घडले. या सर्व परिवर्तनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला. ज्या व्यक्तींनी हे परिवर्तन घडवून आणले, त्यांच्या कार्याची माहिती व त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा महाराष्ट्रातील नव्या पिढीला माहीत व्हाव्या, तसेच या परिवर्तनाचा आलेख महाराष्ट्रासमोर ठेवावा, हा प्रमुख उद्देश ठेवून, महाराष्ट्राच्या सुवर्णमहात्सवाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकने ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ हा प्रकल्प हाती घेतला आहे.

     महाराष्ट्र ही कर्मभूमी मानून १९ व्या व २० व्या शतकात सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी स्वयंप्रेरणेने ज्यांनी आपला सिंहाचा वाटा उचलला आहे, योगदान दिले आहे, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या ६०००हून अधिक शिल्पकारांचा परिचय या प्रकल्पाद्वारे करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, तसेच ३०० तज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.

     इतिहास, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण, न्यायपालिका-प्रशासन-संरक्षण, कृषी-पशुसंवर्धन-सहकार, चित्रपट-संगीत, दृश्यकला (चित्रकला-शिल्पकला-उपयोजितकला), प्राच्यविद्या-धर्मकारण, आरोग्य, समाजकारण-राजकारण, उद्योग-अर्थकारण-पत्रकारिता, क्रीडा-नाटक असे (पंचवीस विषयांवरील) बारा कोश प्रकाशित करण्याची योजना पूर्णत्वास आली आहे.

     मुद्रित स्वरूपात प्रकाशित झालेली ही महाराष्ट्राच्या ६००० शिल्पकारांची प्रेरणादायी चरित्रे आता ‘महाराष्ट्र नायक’ या संकेतस्थळावरून सर्वांसमोर येत आहेत. तर अंदाजे ३००० महाराष्ट्र नायकांचा कार्यपरिचय माहितीपटांच्या स्वरूपात पाहताही येणार आहे.

     महाराष्ट्राच्या सर्वांगीण कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आधुनिक तंत्ज्ञानाशी मेळ साधत नव्या स्वरूपात आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहयोगाने हे संकेतस्थळ आकारास येत आहे.

वैशिष्ट्ये :

  • महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांतील सामूहिक कर्तृत्वाचा परिचय
  • एकात्मिक महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचे दर्शन.
  • कर्तृत्वसंचिताच्या या गाथेमुळे भौगोलिक दृष्ट्या एकत्र आलेल्या महाराष्ट्राचे एकसंघ भावविश्व प्रकट होईल.
  • महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध क्षेत्रांत दुसऱ्या व तिसऱ्या स्तरांवर काम करणाऱ्या अनामिकांचाही परीचय होईल.
  • स्वप्रयत्नांनी मोठेपण प्राप्त करणाऱ्या आणि केवळ एखाद्या पदावरील व्यक्तीपेक्षा पदाला मोठेपण देणाऱ्या व्यक्ती.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांच्या विचारांना चालना मिळेल.
  • महाराष्ट्र नायकांचा विषयाधारित शोध घेता येणार आहे.
  • ६००० महाराष्ट्र नायकांची चरित्रे एकाच संकेतस्थळावर सर्वप्रथम पाहाता येणार आहेत.

 

- महेश पोहनेरकर, 

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

 

 

संकेतस्थळाविषयी: