Skip to main content
x

शेंबेकर, दत्तात्रेय गणेश

आण्णासाहेब शेंबेकर

              त्तात्रेय गणेश उपाख्य आण्णासाहेब शेंबेकर हे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पहिले अध्यक्ष होते. वसंतराव नाईक यांची प्रेरणा, डॉ. गोपाळकृष्ण यांचे मार्गदर्शन व रावसाहेब बोरावके, आबासाहेब बोरावके, आण्णासाहेब चिंचणीकर, के.पी. देशमुख इत्यादी मान्यवरांच्या साथीने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची १९६०मध्ये स्थापना झाली व सर्वांच्या संमतीने आण्णासाहेब शेंबेकर यांची संघाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे नियम व घटना तयार करण्यात आली. ही घटना तयार करताना ज्या मुद्यांचा व नियमांचा अंतर्भाव करण्यात आला त्यावरून आण्णासाहेबांनी द्राक्ष लागवड, द्राक्ष उत्पादक व संघटना या तीनही घटकांचा किती खोलवार विचार केला होता याची साक्ष पटते. पुढील काही काळ आण्णासाहेबांनी संघाचे खजिनदार म्हणूनही कार्यभार सांभाळला. स्वतःच्या बागेत द्राक्षाच्या नवीन जातीची लागवड करून आण्णासाहेबांनी त्या जाती इतर द्राक्ष बागायतदारांना पुरवल्या व मार्गदर्शन केले.

- संपादित

शेंबेकर, दत्तात्रेय गणेश