Skip to main content
x

स्पिंक, वॉल्टर

     प्रो.वॉल्टर स्पिंक यांचा जन्म वोर्सेस्टर (यू.एस.ए.) येथे झाला. उच्च शिक्षणानंतर पुरातत्त्वशास्त्रातील ‘Rock-Cut-Monuments of the Andhra Period : Style and Chronology’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. १९६१ पासून आजपर्यंत त्यांनी मिशिगन विद्यापीठात अध्यापन केले आहे. या कालखंडात त्यांनी ‘अजिंठा’ येथील जगप्रसिद्ध लेण्यांवर अध्ययन व संशोधन केले आहे. वॉल्टर स्पिंक यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे, अजिंठ्याची लेणी ही वीस वर्षांत कोरली गेली आहे, हे सर्वांत प्रथम त्यांनी दाखवून दिले आहे. अजिंठ्यावर त्यांनी लिहिलेली  १) ‘Arguments about Ajanata’   २) ‘Painting, Sculpture, Architecture Ajanta : Year by Year’ ३) The End of the Golden Age, Cave by Cave. ही पुस्तके समग्र व अभ्यासपूर्ण आहेत. तसेच त्यांचे ‘Ajanta to Ellora’ हा ‘मार्ग’ या नियतकालिकाचा विशेष अंक सर्व विद्वानांनी शिरोधार्य मानला. त्यांनी अजिंठा व इतर लेण्यांवर ७०हून अधिक शोधनिबंध व पुस्तके लिहिली आहेत. त्यांना ३०हून अधिक शोध अनुदाने मिळाली. ज्यामध्ये प्रामुख्याने ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’चे अजिंठा येथील काम, ‘Indonesia’ साठीची ‘Fullbright Scholarship’ यांचा समावेश आहे. २०हून अधिक शोध संस्थांचे माननीय सभासदत्व व कित्येक कार्यशाळांमध्ये बीजभाषण त्यांनी दिले आहेत.

वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठ्याच्या प्रसिद्धीकरिता दरवर्षी सर्वसामान्य लोकांकरिता शिबिरे आयोजित केली. त्या शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अजिंठा येथील भित्तिचित्रे व त्यांचे महत्त्व सामान्य लोकांना पटवून दिले. त्यांच्या प्रयत्नांनी सर्वसामान्य जनतादेखील या लेण्या व त्यामधील उत्कृष्ट वारशाविषयी जागरूक झाली. त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे बरेच कला अभ्यासक प्रोत्साहित झाले. वॉल्टर स्पिंक यांचे अजिंठ्यावरचे प्रेम वयाच्या ८५ वर्षीदेखील तेवढेच आहे. दरवर्षी चार महिने अजिंठा-वेरूळ येथे त्यांचे वास्तव्य असते. प्रत्येक वेळी तेवढ्याच उत्साहाने ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात. अजिंठा लेण्यांसाठी त्यांचे अतुलनीय योगदान आहे; ते शब्दांत मांडणे कठीण आहे. त्यांनी केलेले लेखन अनंतकाळपर्यंत अजिंठ्यांच्या चित्रांना बोलते करीत राहील.

—  डॉ. श्रीकांत जाधव

स्पिंक, वॉल्टर