Skip to main content
x

बापट, मुकुंद विनायक

         मुकुंद विनायक बापट यांचा जन्म देवगड तालुक्यातील हिंदळे या गावी झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. मुकुंद बापट यांना शिक्षणानिमित्त मुंबई, पुणे, सावंतवाडी, पणजी, रत्नागिरी या ठिकाणी फिरावे लागले. गणित विषयातील पीएच.डी.ची पदवी मिळवल्यावर ते देवगड तालुक्यातील केळकर महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते व्यवसायाने प्राध्यापक असले तरी त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय शेती हाच होता. त्यांची हिंदळे या गावी शेतजमीन असून आंब्याच्या बागाही आहेत .व्यवसायाने प्राध्यापक असूनही बापट यांना फळबागेत विशेष रस असल्यामुळे त्यांनी आपली फळबाग शास्त्रीय पद्धतीने विकसित केली. नवीन कलम ते कोय कलम पद्धतीने करतात व त्यासाठी ते रायवळ आंब्याची कोय निवडतात. त्याची ‘रुट सिस्टीम’ अधिक सशक्त असल्याने वृक्षाची वाढ चांगली होते. कोय कलमाशेजारी ते रायवळ आंब्याचे कलम लावतात व दोन्ही कलमे दीड-दोन फूटांची झाल्यावर ती दोन्ही कलमे एकमेकाला ‘ग्राफ्ट’ करतात, त्यामुळे रायवळ आंब्याद्वारे हापूस कलमाला अन्नपुरवठा होतो व झाड जोमाने वाढते. त्याचप्रमाणे वृक्ष मोठा झाल्यावर रायवळ आंब्याच्या कलमालाही थोड्या फांद्या येऊ दिल्या जातात. रायवळ आंब्याला मोहोर जास्त येतो व अधिक कीटक आकर्षित होतात व हापूस वृक्षावर ‘पॉलिनेशन’ अधिक प्रमाणात होते व फलधारणा जास्त होते. बापट अधिक उत्पादनासाठी शेणखत, गांडूळ खत व लिंबोणी पेंड या जैविक खतांचा वापर करतात. ते शेतात स्वतःसाठी लागणारा भातही पिकवतात.

   - डॉ. निळकंठ गंगाधर बापट

बापट, मुकुंद विनायक